LPG Price: महागाईचा भडका! बजेटपूर्वी सर्वसामान्यांना धक्का; गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ! पाहा नवे दर

LPG cylinder price hike: आज १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सरकारने सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.
LPG Price
LPG Pricefile photo
Published on
Updated on

LPG cylinder price hike:

नवी दिल्ली : आज १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सरकारने सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरसाठी करण्यात आली आहे. दरम्यान, १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात किंवा वाढ करण्यात आलेली नाही. घरगुती सिलिंडर अजूनही ८ एप्रिल २०२५ रोजी निश्चित केलेल्या दरानेच मिळत आहेत.

LPG Price
Union Budget 2026: केंद्रीय अर्थ संकल्प रविवारी सादर होणार; शेअर मार्केटही खुलं राहणार?

एलपीजीच्या किमती १,७४०.५० रुपयांवर गेल्यानंतर दिल्लीत १९ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत आता १,७४०.५० रुपयांवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे, कोलकातामध्ये किंमत १,८४४.५० रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत आता १६९२.०० रुपयांना उपलब्ध होईल, जे पूर्वी १६४२.५०.५० रुपये होते. चेन्नईमध्ये किंमत १८९९.५० रुपयांवर पोहोचली आहे. सरकारने व्यावसायिक सिलिंडरमध्ये ५० रुपयांची वाढ केली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडर हॉटेल, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि व्यावसायिक कारणांसाठी वापरले जातात.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही

घरगुती वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. हा शेवटचा बदल ८ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आला होता. सध्या दिल्लीत त्याची किंमत ८५३ रुपये आहे. कोलकातामध्ये ८७९ रुपये, मुंबईत ८५२.५० रुपये, चेन्नईमध्ये ८६८.५० रुपये, लखनऊमध्ये ८९०.५० रुपये, अहमदाबादमध्ये ८६० रुपये, हैदराबादमध्ये ९०५ रुपये, वाराणसीमध्ये ९०५ रुपये. पटनामध्ये ९१६.५० आणि १४ किलोचा सिलिंडर ९५१ रुपयांना उपलब्ध आहे.

LPG Price
Union Budget 2026 Live Updates: संसदेत अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण म्हणाल्या, नंबर 1 अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news