Gold Silver Rate Today: सोने - चांदीच्या दरात अचानक उसळी.... दर एवढे का वाढत आहेत, कुठं स्थिरावणार जाणकारांचं मत काय?

Gold Silver Rate Today
Gold Silver Rate Todaypudhari photo
Published on
Updated on

Gold Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या घसरणीनंतर आता मोठी उसळी देखील पहावयास मिळत आहे. मंगळवारी रात्री सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट झाली होती. मंगळवारी एमसीएक्सवर चांदीचे दर ५.५८ टक्क्यांनी तर सोनं २.४५ टक्क्यांनी घटल होतं. मात्र बुधावारी सोने आणि चांदीच्या दरांनी रिकव्हरी केली आहे.

Gold Silver Rate Today
Gold Price Crash: सोन्याचा भाव कोसळणार? किंमत 1 लाखाच्या खाली जाण्याची शक्यता; काय आहे कारण?

MCX वरीत सोनं १.३ टक्क्यांनी अर्थात १९०० रूपयांनी वाढलं आहे. आता सोन्याचे १० ग्रॅमचे दर १.५३ लाखांपर्यंत पोहचले आहेत. तर चांदीच्या दरांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. चांदीची किंमत बुधवारी ४ टक्क्यांनी वाढली असून चांदीचे दर जवळपास ९००० रूपयांनी वाढले आहेत. चांदीचे प्रती किलो दर हे २.३८ लाख रूपये झाले आहेत. सोने आणि चांदी यांचे दर झपाट्यानं वाढत असल्यानं त्यांच्या ईटीएफमध्ये देखील ३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Gold Silver Rate Today
Gold-Silver Price Crash: चांदीचे भाव 8 दिवसांत निम्म्यावर; सोन्यातही मोठी घसरण, गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का?

सोन्या-चांदीचे दर इतका का वाढत आहेत?

सोने आणि चांदीच्या दरात मंगळवारच्या उतारानंतर ही उसळी आली आहे. चांदीचे दर आता २.२६ लाखांपर्यंत पोहचले आहेत. तर सोन्याची किंमत ही १.५० लाख पार गेली आहे. जाणकारांच्या मते सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट झाल्यानंतर आता खालच्या पातळीवर मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली आहे.

दुसरीकडं इराणने होर्मुज जलमार्गाचे काही भाग तात्पूर्ते बंद केले आहेत. या जलमार्गाद्वारे जगाची २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक होते. याचबरोबर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव देखील वाढला आहे. त्यामुळं जाणकारांच्या मते भू राजकीय तणाव यामुळे देखील सोने चांदी दरात वाढ झाली आहे.

Gold Silver Rate Today
Rohit Pawar: कार्लोस नावाचा व्यक्ती कॅकपीटमध्ये जायचा... विम्याचा अँगल, अजित पवारांचं विमान मुद्दामून आदळलं; रोहित यांना शंका

कुठंपर्यंत वाढणार किंमत?

MCX सोन्याबाबत याबाबत आपले मत व्यक्त करताना अनरिच मनी चे सीईओ पोनमुडी आर यांनी सांगितलं की mcx गोल्ड फ्युचर्स 1,80,000-1,81,000 रूपये ऑल टाईम हायवर स्थीर झाल्यानंतर ते १.५० ते १.६० लाखाच्या आसपास स्थीर आहेत. त्यांच्या मते यात अजून तेजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळं किंमती लाँग टर्म सपोर्टच्या वर राहण्याची शक्यता आहे.

जाणकारांच्या मते १.४५ ते १.५० लाख रूपयाच्या सपोर्टमध्ये चांगली खरेदी होण्याची शक्यता आहे. या बेसच्या वर सतत राहणे आणि त्यानंतर १.६० लाख रूपयांच्या आसपास ब्रेकआईट होण्यामुळं सोन्याचे दर हे १.६५ ते १.७५ लाख रूपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. चांदीचे दर देखील ३ लाख ते ३.२५ लाख रूपयांपर्यंत वाढण्याची शक्यता जाणकार व्यक्त करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news