Gold Price Today: सोनं आणखी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; सध्याचे दर काय?

जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली.
Gold Silver Price Today
Gold Silver Price Todayfile photo
Published on
Updated on

Gold Price Today

नवी दिल्ली: जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली. १६ मार्च रोजी सकाळी दिल्ली आणि मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव कमी झाला आहे. गेल्या एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल २,९९० रुपयांची घसरण झाली आहे.

सोन्याच्या दरात मोठी पडझड

दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव घसरून १,५९,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे, तर मुंबईत हा दर १,५९,६५० रुपयांवर स्थिरावला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या बाबतीतही हीच स्थिती असून आठवडाभरात त्याचे भाव ३,६५० रुपयांनी खाली आले आहेत. शुक्रवारी (१३ मार्च) दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात १.२१ टक्क्यांची (जवळपास २,००० रुपये) मोठी घट नोंदवण्यात आली होती.

Gold Silver Price Today
Tech funds performance | आयटी समभागांतील घसरणीनंतरही ‘टेक फंडां’चा दबदबा कसा?

देशातील काही प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर

दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५९,८०० रूपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४६,४९० रूपये इतका आहे. सध्या मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४६,३४० रूपये इतका आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५९,६५० रूपये इतका आहे. ​​या दोन शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५९,६५० रूपये इतका आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४६,३४० रूपये इतका आहे.

चांदीच्या दरात घसरण

चांदीच्या दरांमध्ये घसरणीचा कल कायम आहे. १६ मार्चच्या सकाळपर्यंत, चांदीचा दर प्रति किलोग्राम २,७४,९०० रूपये इतका आहे. गेल्या एका आठवड्यात चांदीच्या दरात १०,००० रूपयांची घट झाली आहे. शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात, चांदीचा दर ११,००० रूपयानीकिंवा ३.९७ टक्क्यांनी घसरून प्रति किलोग्राम २,६५,५०० वर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात, चांदीचा 'स्पॉट' दर प्रति औंस ८०.०३ डॉलर इतका आहे.

दर का घसरत आहेत?

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलर मजबूत होणे आणि जागतिक चलनविषयक धोरणांबाबत असलेली अनिश्चितता ही या घसरणीची मुख्य कारणे आहेत. तसेच, पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर झाला असून, त्यामुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या स्पॉट गोल्ड ४,९८६.३४ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

Gold Silver Price Today
Amazon India Zero Referral Fee: ॲमेझॉन इंडियाचा विक्रेत्यांसाठी मोठा दिलासा; झिरो रेफरल फी लागू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news