Amazon India Zero Referral Fee: ॲमेझॉन इंडियाचा विक्रेत्यांसाठी मोठा दिलासा; झिरो रेफरल फी लागू

लाखो विक्रेत्यांना ७०% पर्यंत बचत, छोट्या व मध्यम व्यवसायांसाठी ऑनलाइन विक्री फायदेशीर
Amazon India Zero Referral Fee
Amazon India Zero Referral FeePudhari
Published on
Updated on

ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी ॲमेझॉन इंडियाने देशातील विक्रेत्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर विक्री करणाऱ्या लाखो विक्रेत्यांसाठी रेफरल फीमध्ये मोठी कपात करत अनेक उत्पादनांवर झिरो रेफरल फी लागू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे विक्रेत्यांना फीमध्ये तब्बल ७० टक्क्यांपर्यंत बचत होणार असून, छोट्या आणि मध्यम उद्योगांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

Amazon India Zero Referral Fee
LPG Gas Shortage: व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णपणे बंद झाला का? सरकारने दिले स्पष्टीकरण

कंपनीच्या माहितीनुसार, झिरो रेफरल फीचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येणार आहे. २०२५ मध्ये ही सुविधा सुमारे १.२ कोटी उत्पादनांवर उपलब्ध होती, मात्र २०२६ पर्यंत ती वाढवून १२.५ कोटी उत्पादनांपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही सुविधा १,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या १८०० हून अधिक उत्पादन श्रेणींवर लागू होणार आहे. यामध्ये टी-शर्ट, बूट, इअरफोन्स, बेडशीट्स, साड्या, इलेक्ट्रिक केटल्स, कॉफी टेबल्स, खुर्च्या, पाळीव प्राण्यांच्या वस्तू, फॅशन ज्वेलरी, खेळणी अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे.

Amazon India Zero Referral Fee
Stock Market Today: जागतिक तणावाचा परिणाम; शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, कोणते शेअर्स वाढले?

याशिवाय, ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या उत्पादनांसाठी इझीशिप फीमध्येही कपात करण्यात आली आहे. या श्रेणीतील उत्पादनांवर इझीशिप चार्जेस सुमारे २० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. इझीशिप सुविधेमुळे विक्रेते आपली उत्पादने त्यांच्या स्वतःच्या ठिकाणावरून पाठवू शकतात, तर पिकअप आणि डिलिव्हरीची जबाबदारी ॲमेझॉनकडून घेतली जाते. त्यामुळे विक्रेत्यांना लॉजिस्टिक्स खर्चातही मोठी बचत होणार आहे.

कंपनीने “सेल मोअर, सेव्ह मोअर” ही नवीन संकल्पना देखील जाहीर केली आहे. याअंतर्गत विक्रेते एकाच बॉक्समधून अनेक युनिट्स पाठवू शकतात. यामुळे दुसऱ्या युनिटसाठी लागणाऱ्या फीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त बचत होऊ शकते. परिणामी, विक्रेत्यांचा एकूण विक्री खर्च कमी होऊन नफा वाढण्याची शक्यता आहे.

Amazon India Zero Referral Fee
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ; 'या' शहरात चांदी पुन्हा ३ लाखांच्या पार!

ॲमेझॉन इंडियाचे सेलिंग पार्टनर सर्व्हिसेस संचालक अमित नंदा यांनी सांगितले की, गेल्या वर्षी फीमध्ये करण्यात आलेल्या कपातीला विक्रेत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याच अनुभवावर आधारित आता ही सुविधा आणखी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. विशेषतः टियर-२ आणि टियर-३ शहरांतील छोटे व्यवसाय आणि उद्योजक यांना ई-कॉमर्समध्ये प्रवेश करणे अधिक सोपे व्हावे, हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काही विक्रेत्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. बंगळुरूस्थित ‘अर्दन स्टोरी’चे सहसंस्थापक आशीष अगरवाल यांनी सांगितले की, फी कपातीमुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा फायदा झाला. कमी किमतीच्या उत्पादनांवर विक्री करणे अधिक फायदेशीर ठरल्याने त्यांनी अधिक उत्पादनांची नोंदणी केली आणि जाहिरातींवरही अधिक गुंतवणूक करता आली. यामुळे त्यांच्या व्यवसायात जवळपास ५० टक्क्यांची वाढ झाली.

Amazon India Zero Referral Fee
Edible Oil Prices: गॅसच्या तुटवड्यानंतर सर्वसामान्यांना मोठा झटका; आता खाद्यतेलही महागलं, किती रुपये मोजावे लागणार?

त्याचप्रमाणे ‘अर्बन प्लॅटर’चे संस्थापक चिराग केनिया यांनी सांगितले की, कमी किमतीच्या उत्पादनांवरील फी कपातीमुळे त्यांच्या ऑर्डरमध्ये ४ ते ५ टक्क्यांनी वाढ झाली. या बचतीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवता आल्याने विक्री आणि महसूल दोन्ही वाढले.

ॲमेझॉनवर विक्रेते सध्या तीन प्रकारच्या फुलफिलमेंट पद्धती वापरू शकतात. ते थेट ग्राहकांना ऑर्डर पाठवू शकतात, इझीशिपच्या माध्यमातून ॲमेझॉनकडून पिकअप आणि डिलिव्हरीची सुविधा घेऊ शकतात किंवा फुलफिल्ड बाय ॲमेझॉन (FBA) पर्याय वापरून साठवण, पॅकिंग आणि शिपिंगची जबाबदारी कंपनीकडे सोपवू शकतात.

दरम्यान, १६ मार्च २०२६ पासून या नव्या फी संरचनेची अंमलबजावणी होणार आहे. उदाहरणार्थ, ९९९ रुपयांच्या नेकलेसवर विक्रेत्यांना सुमारे २२४ रुपयांची म्हणजेच ६९ टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. त्याचप्रमाणे ७९८ रुपयांच्या इअरफोन्सवर ५६ टक्क्यांपर्यंत आणि २९९ रुपयांच्या टी-शर्टवर सुमारे २१ टक्क्यांची फी बचत शक्य होणार आहे. एकूणच, ॲमेझॉन इंडियाच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो लघु व मध्यम विक्रेत्यांसाठी ऑनलाइन व्यवसाय अधिक फायदेशीर आणि सुलभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news