Gold Rate Today: होळीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी स्वस्त; काय आहे आजचा भाव जाणून घ्या

Gold Rate Today: होळीच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 1,64,660 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला असून 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दरही कमी झाले आहेत.
Gold Rate Today
Gold Rate TodayPudhari
Published on
Updated on

Gold Prices Fall on Holi 2026: होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशांतर्गत सराफा बाजारात आज सोन्या चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे. मध्यपूर्वेत वाढलेल्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक आर्थिक बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत.

24 कॅरेट सोन्याच्या भावात घसरण

गुडरिटर्न्सने (goodreturns) दिलेल्या माहितीनुसार आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 1,64,660 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. यापूर्वीच्या सत्रात हा दर 1,67,770 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. म्हणजेच एका दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

Gold Rate Today
Middle East Airline Crisis: मध्य पूर्वेतील संघर्षाचा विमान उद्योगाला मोठा फटका; उड्डाणे रद्द, प्रवासी अडकले, शेअर्स कोसळले

22 कॅरेट सोन्याचा भाव

आज 22 कॅरेट सोन्याच्या दरातही घट दिसून आली आहे. सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 1,50,950 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. काल हा दर 1,53,800 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यामुळे 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत काही प्रमाणात घसरण झाली आहे.

18 कॅरेट सोन्याच्या दरातही घट

18 कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा दर 1,23,530 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. काल हा दर 1,25,870 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर

देशातील प्रमुख शहरांमध्येही सोन्याच्या दरात घट दिसून आली आहे.

  • मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,64,510 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,50,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

  • पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 1,64,510 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,50,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

  • दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,64,660 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,50,950 रुपये आहे.

Gold Rate Today
Strait of Hormuz: तेल पुरवठा थांबला! जर होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तर भारत आणि चीनसह जगाचं किती नुकसान होणार?

सोने खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे का?

तज्ज्ञांच्या मते सोन्या-चांदीचा दीर्घकालीन ट्रेंड सकारात्मक दिसत आहे. मात्र सध्याच्या अस्थिर बाजारात लगेच मोठी खरेदी करण्याऐवजी थोडी स्थिरता येण्याची वाट पाहणे अधिक योग्य ठरेल.

कमोडिटी मार्केट तज्ज्ञ मनोज कुमार जैन यांच्या मते, “सध्याच्या सत्रात सोन्या-चांदीमध्ये नवीन पोझिशन घेण्यापासून थोडे सावध राहावे. बाजारात स्थिरता आल्यानंतरच गुंतवणूक करणे अधिक योग्य ठरेल.”

मध्यपूर्वेतील तणाव, कच्च्या तेलाच्या किंमती आणि जागतिक आर्थिक परिस्थिती यावर पुढील काही दिवस सोन्याच्या दराची दिशा अवलंबून राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news