

Gold Price on Diwali 2026
नवी दिल्ली : दिवाळीच्या मुहूर्तावर देशातील प्रमुख शहरांमध्ये सोने आणि चांदीचे दर जवळपास स्थिर राहिले आहेत. रविवार, ८ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार ५७० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार ६०० रुपये इतका आहे.
Goodreturns ने दिलेल्या माहितीनुसार, १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ७ हजार ६८० रुपये आहे. दरम्यान, चांदीचा भाव प्रति किलो २ लाख ५ हजार रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. दिल्लीमध्ये सोन्याचे दर इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत किंचित जास्त आहेत. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार ६०० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार ७५० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ७ हजार ८३० रुपये इतका आहे.
रविवार, ८ नोव्हेंबर रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत.
दिल्ली : २४ कॅरेट – १,४३,६०० रुपये, २२ कॅरेट – १,३१,७५० रुपये आणि १८ कॅरेट – १,०७,८३० रुपये (प्रति १० ग्रॅम).
मुंबई : २४ कॅरेट – १,४३,५७० रुपये, २२ कॅरेट – १,३१,६०० रुपये आणि १८ कॅरेट – १,०७,६८० रुपये (प्रति १० ग्रॅम).
चेन्नई : २४ कॅरेट – १,४३,५७० रुपये, २२ कॅरेट – १,३१,६०० रुपये आणि १८ कॅरेट – १,०७,६८० रुपये (प्रति १० ग्रॅम).
हैदराबाद : २४ कॅरेट – १,४३,५७० रुपये, २२ कॅरेट – १,३१,६०० रुपये आणि १८ कॅरेट – १,०७,६८० रुपये (प्रति १० ग्रॅम).
बंगळूर : २४ कॅरेट – १,४३,५७० रुपये, २२ कॅरेट – १,३१,६०० रुपये आणि १८ कॅरेट – १,०७,६८० रुपये (प्रति १० ग्रॅम).
देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरू या प्रमुख शहरांमध्ये चांदीचा भाव प्रति किलो २ लाख ५ हजार रुपये इतका आहे. म्हणजेच चांदीचा दर प्रति ग्रॅम २०५ रुपये, तर १० ग्रॅमसाठी २ हजार ५० रुपये आहे.