Diwali festival 2026 | आज अभ्यंगस्नान; सायंकाळी लक्ष्मीपूजन

दीपोत्सवाचा आनंद शिगेला, बाजारपेठांत उत्साहाला उधाण
Lakshmi Puja
लक्ष्मीपूजन
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : पहाटे अंगणात पणत्यांची आरास, सुगंधी उटण्याने अभ्यंगस्नान, नव्या कपड्यांचा साज, फराळाचा दरवळ आणि सायंकाळी लक्ष्मी-कुबेर पूजनाच्या निमित्ताने उजळणारे घर... अशा आनंददायी वातावरणात रविवारी (दि. ८ नोव्हेंबर) दिवाळीचा उत्सव अधिकच रंगणार आहे. यंदा तिथींच्या संयोगामुळे नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याने दिवाळीचा दुहेरी आनंद अनुभवता येणार आहे.

पहाटे अभ्यंगस्नानाने दिवसाची सुरुवात होणार असून, सायंकाळी कुटुंबीयांच्या उपस्थितीत लक्ष्मी-कुबेरपूजन केले जाणार आहे. घराघरांत सुरू असलेली सजावटीची लगबग, फराळाची तयारी आणि बाजारपेठांमधील खरेदीचा उत्साह यामुळे शहरात सर्वत्र दीपोत्सवाचे मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याने आनंद आणखी द्विगुणीत झाला आहे.

सकाळी ६.४३ पर्यंत अभ्यंगस्नानाचा मुहूर्त

रविवार, ८ नोव्हेंबर रोजी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी येत असून, रविवारी सकाळी ११ वाजून २८ मिनिटांनी चतुर्दशी संपून अमावास्या सुरू होणार आहे. तसेच सायंकाळी प्रदोषकाळी अमावास्या असल्याने याच दिवशी लक्ष्मी-कुबेरपूजनाचा योग जुळून आला. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे ५ वाजून ३८ मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत, म्हणजेच सकाळी ६ वाजून ४३ मिनिटांपर्यंत अभ्यंगस्नानाचा मुहूर्त आहे, अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

लक्ष्मीपूजन मुहूर्त

लक्ष्मीपूजनासाठी सायं. ५.५० ते रात्री १०.५० वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यातही सायं. ६ ते रात्री ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंत प्रदोषकाळात लक्ष्मी-कुबेर पूजनाचा मुहूर्त आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.