Gold Price Today: ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव वाढला; चांदी मात्र स्वस्त झाली, 22 आणि 24 कॅरेटचे नवे दर काय?

Gold Silver Price Today: ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात वाढ झाली असून 22 आणि 24 कॅरेट सोने महागले आहेत.
Gold Silver Price Today
Gold Silver Price TodayPudhari
Published on: 
Updated on: 

Gold Silver Price Today: नवीन महिन्याची सुरुवात सोन्याच्या दरवाढीने झाली आहे. 1 ऑक्टोबर रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात वाढ झाली असून 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव वाढले आहेत. दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता आणि बंगळुरूमध्ये सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे.

मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,48,930 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,37,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,49,580 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,37,110 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुणे आणि बंगळुरूमध्येही सोन्याचे दर मुंबईप्रमाणेच आहेत. या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,49,580 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,37,110 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

दिल्लीच्या सराफा बाजारातही सोन्याला तेजी

ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ होण्यापूर्वीच दिल्लीच्या सराफा बाजारात तेजी दिसून आली होती. एक दिवस आधी 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली होती.

कमी झालेल्या दराचा फायदा घेत गुंतवणूकदारांनी सोन्याची खरेदी वाढवल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीला आधार मिळाला. त्यामुळे नवीन महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.

Gold Silver Price Today
Gautam Gambhir: 811 धावा, गिलचं द्विशतक अन् भारताचा ऐतिहासिक विजय; तरी गंभीर नाराज, म्हणाला, 'हे क्रिकेट नाही, फक्त...'

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर वाढले

देशातील सोन्याच्या किमतीवर केवळ स्थानिक बाजारातील मागणी-पुरवठ्याचा परिणाम होत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे दर, डॉलरची स्थिती आणि इतर जागतिक घडामोडींचाही देशातील सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो.

आज 1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर 4,152.86 डॉलर प्रति औंस होता. त्यामुळे जागतिक बाजारातील हालचालींचाही भारतीय बाजारावर परिणाम होत आहे.

Gold Silver Price Today
Stock Market Today: ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी बाजार कोसळला; सेन्सेक्स 288 अंकांनी खाली, गुंतवणूकदारांचे 1.4 लाख कोटी बुडाले

चांदीच्या दरात मात्र घसरण

सोन्याच्या दरात वाढ होत असताना चांदीच्या किमतीत मात्र घसरण झाली आहे. आज चांदीचा दर 2,39,900 रुपये प्रति किलो आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा दर 60.18 डॉलर प्रति औंस आहे. याआधी जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात चांदीच्या दराने तब्बल 4 लाख रुपये प्रति किलोचा विक्रमी स्तर गाठला होता.

एकूणच, ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दराने पुन्हा तेजी पकडली आहे, तर चांदीच्या दरात काहीशी घसरण दिसत आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी बाजारातील पुढील हालचाली महत्त्वाच्या ठरणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news