Gold Price Discount: 10 ग्रॅम सोन्यावर मिळतेय 5 हजार रुपयांपर्यंत सूट; कुठे आणि कशी मिळवायची? सर्व माहिती जाणून घ्या

Gold Price Discount: ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मोठ्या प्रमाणात बिलाशिवाय रोख खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बाजारभावाच्या तुलनेत स्वस्त सोनं मिळू शकतं.
Gold Price Discount
Gold Price DiscountPudhari
Published on: 
Updated on: 

Gold Price Discount: देशात सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली असली, तरी सर्वसामान्यांसाठी सोने अजूनही महागच आहे. सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर सुमारे 1 लाख 48 हजार 600 रुपयांवर आहे. भारतात सोन्याला मोठी मागणी असल्याने अनेक जण बचत करून सोने खरेदी करण्याचा विचार करतात. त्यातच सोन्यावर चांगली सूट मिळत असेल, तर ग्राहकांसाठी ही आकर्षक बाब ठरू शकते. मात्र, ही सूट नेमकी कुठे आणि कशा प्रकारे मिळते, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

सोन्यावर कुठे मिळते सूट?

सोन्याच्या वाढलेल्या किमतीमुळे ग्राहकांवर आर्थिक भार वाढला आहे. त्यातच सोन्याच्या आयातीवरील शुल्क आणि इतर करांमुळे सोन्याची किंमत आणखी वाढते. त्यामुळे काही ग्राहक औपचारिक पद्धतीने बिल घेऊन सोने खरेदी करण्याऐवजी रोख पैशांत आणि बिलाशिवाय व्यवहार करण्याकडे वळत आहेत.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मोठ्या प्रमाणात बिलाशिवाय रोख पैशांत सोने खरेदी करणाऱ्या घाऊक ग्राहकांना बाजारभावाच्या तुलनेत सुमारे 6 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. तर किरकोळ बाजारात ग्राहक आणि विक्रेत्यामधील चर्चेनुसार 10 ग्रॅम सोन्यावर काही हजार रुपयांची बचत होऊ शकते. काही व्यवहारांमध्ये ही बचत 10 हजार रुपयांपर्यंत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ही सूट का दिली जाते?

बिलाशिवाय रोख व्यवहारामध्ये विक्रेत्याचा व्यवहाराचा अधिकृत हिशोब बदलतो. अशा व्यवहारातून कर आणि कागदोपत्री खर्च टाळण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून विक्रेत्याची काही रक्कम वाचू शकते आणि त्यातील काही भाग ग्राहकाला कमी किमतीच्या रूपात दिला जाऊ शकतो.

मात्र, ग्राहकांना दिसणारी ही बचत प्रत्यक्षात जोखमीशिवाय मिळत नाही. बिलाशिवाय सोने खरेदी करताना ग्राहकाने या व्यवहारातील कायदेशीर आणि आर्थिक जोखीम लक्षात घेणे आवश्यक आहे.

Gold Price Discount
October 1 Rule Changes: 1 ऑक्टोबरपासून देशात 5 मोठे बदल होणार; LPG, ATMपासून टीव्ही-फ्रिजपर्यंत... काय काय बदलणार?

बिलाशिवाय सोने खरेदी केल्यास काय नुकसान होऊ शकते?

बिल किंवा अधिकृत पावती नसल्यास खरेदी केलेल्या सोन्याबाबत पुरावा राहात नाही. सोन्याची शुद्धता, वजन आणि खरेदीची किंमत याबाबत भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

बिल नसल्यामुळे सोन्याच्या शुद्धतेबाबतही ग्राहकाला अडचण येऊ शकते. त्याचप्रमाणे भविष्यात हे सोने विकताना किंवा त्याची अदलाबदल करताना योग्य किंमत मिळण्यात अडथळे येऊ शकतात.

याशिवाय मोठ्या रकमेचे रोख व्यवहार करताना कर आणि इतर नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. व्यवहाराची योग्य कागदपत्रे नसल्यास भविष्यात कर विभाग किंवा इतर सरकारी यंत्रणांकडून चौकशी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

Gold Price Discount
Gold Price Today: सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; तीन दिवसांत सोनं 3,890 रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली, काय आहे भाव?

स्वस्त सोने दिसत असले तरी सावध राहा

10 ग्रॅम सोन्यावर 5 हजार किंवा त्याहून अधिक बचत होत असल्याचे दिसत असले, तरी केवळ कमी किमतीच्या मोहापोटी बिलाशिवाय सोने खरेदी करणे धोकादायक ठरू शकते. सोने खरेदी करताना अधिकृत बिल, शुद्धतेची माहिती आणि आवश्यक प्रमाणपत्रे घेणे ग्राहकाच्या हिताचे आहे.

थोडक्यात, सोन्याच्या किमतीत मिळणारी सूट आकर्षक वाटत असली तरी बिलाशिवाय होणाऱ्या व्यवहारात भविष्यात मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी सूटपेक्षा व्यवहाराची सुरक्षितता आणि कागदपत्रे अधिक महत्त्वाची आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news