Gold Price Today | उच्चाकांवरुन सोने साडेपाच हजारांनी स्वस्त, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर काय?

सोने- चांदी दरात बदल झाला आहे
Gold Price Today
Gold Price Today(Pudhari Photo)
Published on
Updated on

Gold Price Today

सोन्याच्या दरात आणखी घट झाली आहे. शुक्रवारी शुद्ध सोन्याचा दर (२४ कॅरेट) १,३७५ रुपयांनी कमी होऊन प्रति १० ग्रॅम ९५,७८४ रुपयांपर्यंत खाली आला. गुरुवारी हा दर ९७,१५९ रुपयांवर होता. तसेच चांदीचा दरही प्रति किलोमागे १,९५७ रुपयांनी कमी झाला.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ९५,७८४ रुपये, २२ कॅरेट ८७,७३८ रुपये, १८ कॅरेट ७१,८३८ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ५६,०३४ रुपयांवर बंद झाला. तर चांदीचा दर प्रति किलो १,०५,१९३ रुपयांवर स्थिरावला. हे दर जीएसटीविना असतात.

Gold Price Today
Stock Market Closing | बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स पुन्हा ८४ हजार पार

मल्टिकमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९५,६३० रुपयांपर्यंत खाली आला. एमसीएक्सवर १६ जून रोजी सोन्याने १,०१,०७८ रुपयांचा विक्रमी उच्चांक नोंदवला होता. या उच्चांकावरुन सध्याचा दर ५,४४८ रुपयांनी कमी आहे.

Gold Price Today
loans : गरज नसताना कर्ज घेण्याचे धोके

सोने दरातील घसरणीचे कारण काय?

इस्रायल- इराण यांच्यामधील युद्धबंदीमुळे सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. जागतिक अनिश्चिततेदरम्यान गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात. या काळात सोन्याच्या दरात वाढ होते. इस्रायल- इराण तणावादरम्यानही सोन्याच्या दरात वाढ झाली होती. पण दोन्ही देशांतील तणाव निवळल्यानंतर सोने उच्चांकावरुन खाली येऊ लागले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. सलग दुसऱ्या आठवड्यात सोने दरात घसरण दिसून आली आहे. इस्रायल-इराण युद्धबंदीमुळे सोन्याच्या किमती खाली आल्याचे सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news