

एका दिवसाच्या तेजी नंतर पुन्हा एकदा सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आज 8 नोव्हेंबर रोजी देशभरातील बाजारात सोन्याचे भाव खाली आले असून, दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,22,160 रुपये इतका झाला आहे. देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही सोन्याच्या भावात घसरण दिसत आहे.
दिल्ली बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,22,160 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोनं 1,12,510 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे.
या तिन्ही महानगरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,12,360 रुपये प्रति 10 ग्रॅम, आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,22,580 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
पुणे आणि बेंगळुरूमध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,22,010 रुपये, तर 22 कॅरेट सोनं 1,11,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 3,996.93 डॉलर प्रति औंस झाला आहे. गुंतवणूकदारांसाठी हे संकेत महत्त्वाचे ठरत आहेत. गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार, डिसेंबर 2026 पर्यंत सोने 4,900 डॉलर प्रति औंस या पातळीवर जाऊ शकते. तर ANZ बँकेने 2026 च्या मध्यापर्यंत 4,600 डॉलर प्रति औंस दराचा अंदाज व्यक्त केला आहे. डीएसपी मेरिल लिंचच्या मते, सोन्यातील तेजी अजून थांबलेली नाही.
सोन्यासोबतच चांदीच्या भावातही घसरण झाली आहे. 8 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव 1,52,400 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. देशातील सोन्या-चांदीचे भाव केवळ देशांतर्गत मागणीवर नाही, तर जागतिक बाजारातील हालचालींवरही अवलंबून असतात. सध्या जागतिक बाजारात चांदीचा भाव 48.48 डॉलर प्रति औंस इतका आहे.