Gold Crash Alert: सोन्याच्या दरात आतापर्यंत तब्बल 34 हजारांची घसरण; आता आणखी 37 टक्के स्वस्त होणार?

Gold Price Crash Prediction: जानेवारीपासून सोन्याच्या दरात सुमारे ₹34,000 ची घसरण झाली असून वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने आणखी मोठ्या घसरणीचा इशारा दिला आहे.
Gold Price Crash Prediction
Gold Price Crash PredictionPudhari
Published on
Updated on

Gold Price Crash Prediction: गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली असून, ही घसरण अजून थांबलेली नसल्याचा इशारा वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (WGC) दिला आहे. वर्षाच्या सुरुवातीला विक्रमी उच्चांक गाठलेल्या सोन्याच्या दरात आधीच मोठी घट झाली असून, आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती कायम राहिल्यास आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आतापर्यंत किती घसरले सोने?

यंदा जानेवारी महिन्यात 10 ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे 1.76 लाख रुपये या उच्चांकावर पोहोचला होता. त्यानंतर जागतिक घडामोडी, मध्यपूर्वेतील तणावातील बदल आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतारामुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे 1.42 लाख रुपयांवर आला आहे. म्हणजेच, जानेवारीच्या तुलनेत सोने सुमारे 34 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे.

WGC चा मोठा इशारा

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 3,857 डॉलर प्रति औंस या महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हलच्या खाली गेल्यास घसरण आणखी वाढू शकते.

अशा परिस्थितीत सोन्याचा पुढील आधार 3,500 डॉलर प्रति औंस असू शकतो. हा स्तर गाठल्यास, जानेवारी 2026 मधील विक्रमी उच्चांकाच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत सुमारे 37 टक्क्यांपर्यंत घसरण होऊ शकते.

घसरणीमागील प्रमुख कारणे

तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किमतीवर खालील घटकांचा मोठा परिणाम होत आहे:

  • मध्यपूर्वेतील भू-राजकीय परिस्थितीतील बदल

  • कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण

  • जागतिक गुंतवणूकदारांचा बदलता कल

  • अमेरिकन डॉलरची हालचाल

  • अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाची अनिश्चितता

Gold Price Crash Prediction
CJP Future Strategy: राजकीय पक्ष म्हणून नव्हे, आता ‘या’ नव्या भूमिकेत मैदानात उतरणार CJP; सौरव दासने केला मोठा खुलासा

डॉलर आणि जपानी येन ठरू शकतात निर्णायक

WGC च्या मते, अमेरिकन डॉलर आणि जपानी येनची हालचाल पुढील काळात सोन्याच्या दरासाठी महत्त्वाची ठरेल. जर जपानी येन मजबूत झाला आणि अमेरिकन डॉलर कमकुवत झाला, तर सोन्याच्या किमतींना पुन्हा आधार मिळू शकतो.

तसेच, अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर स्थिर ठेवले तर सोन्याच्या बाजाराला काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. मात्र, भविष्यात व्याजदर वाढवण्याचा निर्णय झाल्यास सोन्यावर आणखी दबाव येण्याची शक्यता आहे.

Gold Price Crash Prediction
Non Dairy Paneer Ban: तुकाराम मुंढेंची बनावट पनीरवर मोठी कारवाई; नॉन-डेअरी पनीरवर बंदी; नियम मोडल्यास कोणती शिक्षा होणार?

गुंतवणूकदारांनी काय करावे?

तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत घाईघाईने मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. विशेषतः दागिने खरेदीचा प्लॅन करणारे आणि सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली आणि RBI तसेच अमेरिकन फेडच्या धोरणांवर लक्ष ठेवावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news