

Gold and Silver Prices Crash: सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. देशाच्या वायदा बाजारात सोन्याचे भाव 200 रुपयांहून अधिक घसरले, तर चांदीचा भाव तब्बल 2,400 रुपयांनी कोसळला आहे. फेडरल रिझर्व्हच्या महत्त्वाच्या धोरण बैठकीपूर्वी गुंतवणूकदार सावध भूमिका घेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा भाव 229 रुपयांनी घसरून 1,30,233 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका खाली आला. शुक्रवारी तो 1,30,462 रुपये होता. सकाळी ओपनिंग 1,30,431 रुपये होती आणि 9.50 वाजता सोने 45 रुपयांनी घसरून 1,30,417 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होते.
सोन्याचा लाइफटाइम हाय 1,34,024 रुपये आहे.
आज चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. MCX वर चांदी 2,434 रुपयांनी कोसळून 1,80,974 रुपयांवर आली. शुक्रवारी हा भाव 1,83,408 रुपये होता. सकाळी 1,81,900 रुपयांवर ओपन झालेली चांदी 9.50 वाजता 1,588 रुपयांच्या घसरणीसह 1,81,820 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होती. चांदीचा लाइफटाइम हाय 1,85,234 रुपये असून सध्या ती त्यापेक्षा 2% नी कमी आहे.
10 डिसेंबर रोजी होणाऱ्या FOMC (फेडरल ओपन मार्केट कमेटी) बैठकीपूर्वी जागतिक बाजारात प्रचंड अस्थिरता दिसत आहे. CME फेडवॉच टूलनुसार, गुंतवणूकदार 25 बेसिस पॉइंट्सने व्याजदर कपातीची 88% शक्यता व्यक्त करत आहेत. दरकपातीच्या या अपेक्षेमुळे डॉलर कमकुवत झाला आणि त्याचा परिणाम सोन्या–चांदीवर झाला.
कमोडिटी विश्लेषक मनोज कुमार जैन यांच्या मते, अमेरिकन फेड धोरणातील अनिश्चिततेमुळे सोन्या–चांदीच्या भावात चढ-उतार होत आहेत. डॉलर इंडेक्स एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर आल्याने सोने आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसाठी अधिक स्वस्त झाले आहे.