Swiggy Instamart: चेन्नईत 1 लाखांचे कंडोम ते मुंबईत 15 लाखांचं सोनं; 2025 मध्ये ग्राहकांनी ऑनलाईन काय खरेदी केलं?

Swiggy Instamart 2025 Report: Swiggy Instamart च्या 2025 अहवालात भारतीयांच्या खरेदीच्या सवयींचं वेगळंच चित्र समोर आलं आहे. टियर-2 शहरांमधूनही ऑर्डर्समध्ये मोठी वाढ दिसून आली आहे.
Swiggy Instamart 2025 Report
Swiggy Instamart 2025 ReportPudhari
Published on
Updated on

Swiggy Instamart 2025 Report: ऑनलाइन खरेदीचा ट्रेंड भारतात वेगाने वाढत आहे. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे Swiggy Instamart 2025 चा ऑर्डर रिपोर्ट. या अहवालातून रोजच्या किरकोळ खरेदीपासून ते लाखो रुपयांच्या लक्झरी वस्तूंपर्यंत भारतीय ग्राहक कशी खरेदी करत आहेत, याची झलक पाहायला मिळते.

Instamart वर 2025 मध्ये चेन्नईतील एका ग्राहकाने वर्षभरात कंडोमवर 1 लाख रुपयांहून अधिक खर्च केला आहे. बंगळुरूतील एका युजरने केवळ 10 रुपयांच्या प्रिंटआउटसाठी ऑर्डर दिली, तर हैदराबादमधील एका ग्राहकाने iPhone खरेदीसाठी 4.3 लाख रुपये खर्च केले. मुंबईतील एका ग्राहकाने तर Instamart वरून थेट 15.16 लाख रुपयांचं सोनं खरेदी केलं.

Swiggy Instamart 2025 Report
Metal Investment: सोनं किंवा चांदी नाही... तर हा धातू आहे खरा 'किंग'; तज्ञ म्हणतात, करोडपती बनवू शकतो

टियर-2 शहरांमधूनही मोठ्या ऑर्डर्स

हा ट्रेंड केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. टियर-2 शहरांमधून Instamart च्या ऑर्डर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. राजकोटमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल दहापट ऑर्डर्स वाढल्या आहेत. लुधियानामध्ये सातपट, तर भुवनेश्वरमध्ये चारपट वाढ झाली आहे. यावरून ऑनलाईन डिलिव्हरी सेवा आता लहान शहरांमध्येही लोकप्रिय होत आहेत.

रोजच्या वापरातील वस्तूंची मागणी वाढली

महागड्या आणि हटके ऑर्डर्स चर्चेत असल्या, तरी Instamart वर सर्वाधिक वेळा मागवल्या जाणाऱ्या वस्तू अजूनही रोजच्या वापरातीलच आहेत. कढीपत्ता, दही, अंडी, दूध आणि केळी या वस्तू सर्वाधिक रिपीट ऑर्डर्समध्ये आहेत. कोचीनमधील एका ग्राहकाने तर एका वर्षात तब्बल 368 वेळा कढीपत्ता मागवला, म्हणजे जवळपास रोजच.

Swiggy Instamart 2025 Report
New Rules 2026: 1 जानेवारी 2026 पासून काय-काय बदलणार? बँकिंगपासून शेतकरी योजनांपर्यंत मोठे बदल होणार

कोणत्या वेळी जास्त ऑर्डर्स?

देशभरात Instamart वर सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत सर्वाधिक ऑर्डर्स दिल्या जात असल्याचं अहवालात दिसून आलं आहे. सोमवार हा गिफ्टिंगसाठी सर्वाधिक पसंतीचा दिवस आहे. बंगळुरूतील एका युजरने तर वर्षभरात डिलिव्हरी पार्टनर्सना टिप्स म्हणून 68,600 रुपये दिले आहेत. हा सगळा डेटा “How India Instamarted 2025” या अहवालात आहे.

दरम्यान, Instamart चालवणाऱ्या Swiggy ची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. सप्टेंबर 2025 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा तोटा वाढून 1,092 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा तोटा 626 कोटी रुपये होता. क्विक कॉमर्स सेगमेंटमधील सततचा तोटा आणि जाहिरात व विक्रीवरील वाढलेला खर्च यामुळे हा फटका बसल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

भारतात क्विक कॉमर्स केवळ दूध-दहीपुरती मर्यादित राहिलेली नाही. आज ग्राहक कंडोमपासून सोन्यापर्यंत सगळंच काही काही मिनिटांत मागवू लागले आहेत. शहरं लहान असोत किंवा मोठी, भारतीयांची खरेदीची सवय आणि अपेक्षा दोन्ही झपाट्याने बदलत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news