EPFO PF Transfer: नोकरी बदलणाऱ्यांसाठी मोठा दिलासा! आता PF ट्रान्सफरसाठी अर्ज करण्याची गरज नाही; EPFOचा नवा नियम लागू

EPFO PF Transfer: EPFO ने नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी PF ट्रान्सफरची प्रक्रिया अधिक सोपी केली असून, पात्र सदस्यांची PF रक्कम आता आपोआप नव्या खात्यात ट्रान्सफर होणार आहे.
EPFO PF Transfer
EPFO PF TransferPudhari
Published on
Updated on

EPFO PF Transfer: नोकरी बदलल्यानंतर आता PF एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) PF ट्रान्सफरची प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान करण्यासाठी नवा नियम लागू केला आहे.

आतापर्यंत नोकरी बदलल्यानंतर जुन्या कंपनीतील PF रक्कम नव्या कंपनीच्या PF खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करावा लागत होता. काही प्रकरणांमध्ये कंपनीची पडताळणीही आवश्यक असायची. त्यामुळे PF ट्रान्सफरची प्रक्रिया वेळखाऊ होती.

नेमका काय बदल झाला?

EPFO ने अलीकडेच Centralised IT Enabled Services (CITES) हे नवे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. या प्रणालीमुळे सदस्यांची सर्व माहिती एकाच वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याला आता PF ट्रान्सफर करण्यासाठी वेगळा फॉर्म भरावा लागणार नाही.

UAN ची भूमिका काय?

प्रत्येक कर्मचाऱ्याला EPFO कडून एक Universal Account Number (UAN) दिला जातो. हा क्रमांक संपूर्ण नोकरीच्या कारकिर्दीत कायम एकच राहतो. मात्र, प्रत्येक नवीन कंपनीत रुजू झाल्यानंतर त्या कंपनीसाठी स्वतंत्र PF Member ID तयार होते.

पूर्वी या वेगवेगळ्या Member ID मधील PF रक्कम एकत्र करण्यासाठी कर्मचाऱ्याला अर्ज करावा लागत असे. आता मात्र EPFO ची नवी प्रणाली एकाच UAN अंतर्गत असलेले Member ID आपोआप जोडून PF ट्रान्सफर करणार आहे.

EPFO PF Transfer
Sonam Wangchuk Strike: 'मी शरीराने अशक्त, पण मनाने खंबीर'; सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 17 वा दिवस, प्रकृती चिंताजनक

कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार?

अनेक कर्मचारी करिअरमध्ये अनेक वेळा नोकरी बदलतात. त्यामुळे एका UAN अंतर्गत अनेक PF Member ID तयार होतात. यामुळे PF रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये राहते.

नव्या प्रणालीमुळे सर्व PF खाते एकत्र मॅनेज करणे सोपे होणार आहे. निवृत्तीची बचत एका ठिकाणी दिसेल आणि PF ट्रान्सफरची प्रक्रिया अधिक जलद होईल. याशिवाय कागदपत्रांची संख्या कमी होऊन कर्मचाऱ्यांचा वेळही वाचणार आहे.

तुमची Service History कशी तपासाल?

कर्मचारी EPFO च्या Unified Member Portal वर आपल्या UAN च्या मदतीने लॉग इन करून OTP पडताळणीनंतर 'Service History' या विभागात जाऊन पूर्वीच्या आणि सध्याच्या नोकरीची माहिती पाहू शकतात. याच माध्यमातून सर्व Member ID योग्य प्रकारे UAN शी जोडले गेले आहेत की नाही, याची खात्रीही करता येते.

EPFO PF Transfer
Bank Jobs: बँकिंग क्षेत्रात मोठी उलथापालथ! HDFC, Axis आणि Kotak मधून 7,700 हून अधिक कर्मचारी झाले कमी; नेमकं कारण काय?

EPFO च्या डिजिटल सेवांमध्ये आणखी सुधारणा

CITES प्लॅटफॉर्म सुरू झाल्यानंतर EPFO ने केवळ PF ट्रान्सफरची प्रक्रिया सोपी केलेली नाही, तर अनेक महत्त्वाच्या डिजिटल सुविधा सुरू केल्या आहेत.

यामध्ये Centralised Claim Processing, Centralised Payment System आणि 'Any Office' Service Model यांचा समावेश आहे. या सुविधेमुळे सदस्यांना आता त्यांच्या खात्याशी संबंधित कोणत्याही कामासाठी ठरावीक EPFO कार्यालयात जाण्याची गरज नाही. देशातील कोणत्याही EPFO कार्यालयातून सेवा घेता येणार आहे.

कोणाला मिळणार या सुविधेचा लाभ?

ही सुविधा अशा कर्मचाऱ्यांसाठी लागू होईल, ज्यांचा UAN आधारशी लिंक आहे, KYC पूर्ण आहे आणि EPFO च्या आवश्यक अटी पूर्ण झालेल्या आहेत. अशा सदस्यांची PF रक्कम नोकरी बदलल्यानंतर स्वतंत्र अर्ज न करता ट्रान्सफर होईल.

EPFO च्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी PF व्यवस्थापन अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः वारंवार नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news