PF Withdrawals : पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम काढणे शक्य; पीएफ २.१ प्रणाली लागू

UPI PF withdrawal facility |
UPI PF withdrawal facility | यूपीआयद्वारे आता काढता येणार पीएफ
Published on
Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) संदर्भात पीएफ २.१ ही नवीन डिजिटल प्रणाली लागू केली आहे. यामुळे भविष्य निर्वाह निधी संदर्भातील अनेक सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ होणार आहेत. नवीन व्यवस्थेनुसार पीएफ काढण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सोपी करण्यात आली आहे. क्लेमसाठी लागणारा वेळ कमी होणार असून, सर्व प्रक्रिया एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर पार पडणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना विविध कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी होईल.

या नव्या प्रणालीअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यातील एकूण जमा रकमेपैकी ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय, लवकरच युपीआयद्वारे पीएफची रक्कम थेट बँक खात्यात मिळण्याची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे. ही सुविधा प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर काही दिवसांत उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. तसेच भविष्यात एटीएममधून पीएफची रक्कम काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे.

नवीन प्रणाली लागू करण्यासाठी १ जुलै रोजी पीएफ पोर्टलवरील काही सेवा तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. २ जुलैपासून पीएफ २.१ प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर सर्व सेवा पुन्हा नियमितपणे सुरू झाल्या. सरकारच्या मते, पीएफ २.१ मुळे पीएफ क्लेमची प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ आणि नागरिकाभिमुख होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना गरजेच्या वेळी निधी सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news