dhanteras 2026 : धनत्रयोदशीला सोनं खरेदी करावं की चांदी... काय ठरेल जास्त फायदेशीर?

यंदा सोने आणि चांदी यांची स्थिती गुंतवणुकीसाठी कशी आहे?
dhanteras 2026
dhanteras 2026pudhari
Published on: 
Updated on: 

dhanteras 2026 Gold Silver buying : आज ६ नोव्हेंबर २०२६ धनत्रयोदशीचा सण संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. दिवाळीचा हा पहिला दिवस या दिवशी लोक मोठ्या संख्येने सोने किंवा चांदी खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी खेरीदी करणे शुभ मानले जाते. मात्र यंदा सोने आणि चांदी यांची स्थिती गुंतवणुकीसाठी कशी आहे अन् भविष्यात सोने आणि चांदीबाबत संभ्रम अवस्था आहे.

dhanteras 2026
Gold Silver Price Today: धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीचा भाव वाढला; ५ दिवसांत इतके महागले दर, आता खरेदी करावी की थांबावे?

सोने चांदीच्या दरात मोठी घसरण

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या रिपोर्टनुसार ३० जानेवारी २०२६ ला २४ कॅरेट सोन्याचा दर एक तोळ्याला १ लाख ७६ हजार १२१ रूपये होता. गुरूवारी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सोन्याचा हाच दर १ लाख ४४ हजरा १२९ रूपयांपर्यंत खाली आला आहे. सोन्याचा दर तोळ्यामागे ३१ हजार ९९२ रूपयांनी घसरला आहे.

चांदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर २९ जानेवारी २०२६ रोजी एक किलो चांदीचा दर हा ३ लाख ७९ हजार ९८८ रूपये होता. तो आता गुरूवारी प्रती किलो १ लाख ८७ हजार ३०० रूपयांपर्यंत खाली आला होता. म्हणजे या काळात चांदीच्या प्रती किलो दरात १ लाख ९२ हजार ६८८ रूपयांची घट झाली आहे. त्यामुळं धनत्रयोदशीला काय खरेदी करणं फायदेशीर ठरले याची माहिती घेऊयात.

dhanteras 2026
Gold Silver Price Today: सोने खरेदीला जाण्यापूर्वी थांबा! धनत्रयोदशीच्या तोंडावर दर वाढले, चांदीच्या दरात मात्र घसरण; काय आहे आजचा भाव?

मोठ्या घसरणीनंतर स्थीर

सोने आणि चांदीचे दर रेकॉर्ड हाय पासून मोठ्या प्रमाणावर खाली आल्यानंतर आता रिकव्हरी मोडमध्ये दिसत आहे. ५ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याचा दर ४१३० डॉलर प्रती औंस झाला होता. तर चांदीच्या दरात ५२ डॉलर प्रती औंस वाढ झाली होती. या तेजीच्या मागे डॉलरची घसरण, बाँड यील्ड खाली येणे ही कारणे आहेत.

मात्र ही तेजी येणाऱ्या काळात सोने आणि चांदीचे दर वाढत जातील असा संकेत देत नाहीत. गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व फॅक्टर तपासून पहावेत असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

dhanteras 2026
Belgaum Investment Scam: बेळगावच्या गुंतवणूक घोटाळ्यात १० हजार गुंतवणूकदार महाराष्ट्राचे; ईडीकडून ४२७ कोटींची मालमत्ता जप्त

कोणत्या गोष्टीचा प्रभाव पडणार?

सध्याच्या घडीला सोने आणि चांदीच्या किंमतीत अनेक फॅक्टर प्रभावित करतात. यात व्याज दर, अमेरिकन डॉलरची स्थिती, महागाई आणि तसेच उद्योगातील मागणी आणि पुरवठ्याचा इंडेक्स याचा प्रभाव असतो. सोन्याची किंमतींना आगामी काळात स्टेंट्रल बँकेकडून होणाऱ्या खरेदीमुळं आधार मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्थेत उलथा पालथ याचा फायदा देखील सोन्याच्या दराला मिळू शकतो. तसेच सरकारांवर वाढते कर्ज, सरकारी तूट, करन्सीची सिथिती यामुळे देखील सोन्याचे महत्व वाढणार आहे.

शॉर्ट टर्ममध्ये सोन्याच्या किंमती अमेरिकेचे व्याज दरांच्या दिशेवर अवलंबून असणार आहे. जर व्याज दरात घट झाली किंवा डॉलर घसरला तर सोन्याला चांगला भाव मिळेल. जर व्याजदर वाढले, बाँड यील्डमध्ये देखील वाढ जाली तर याचा नकारात्मक परिणाम सोन्यावर दिसू शकतो.

dhanteras 2026
India Gold Market : भारताची सोने मागणी सहा वर्षांच्या नीचांकावर, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचा अंदाज, दरवाढीमुळे घटली मागणी

चांदीची काय स्थिती?

चांदीच्या बाबतीत बोलायचं झालं त्याच्या मागणीच्या वेगावर चांदीचे दर अवलंबून असणार आहेत. चांदी गुतवणूक सोडून सोलर एनर्जी, इलेक्ट्रिक व्हेएकल्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यात वापरली जाते. लाँग टर्ममध्ये या सेक्टरमध्ये मागणी अधिक राहण्याची शक्यता आहे. मात्र सोन्यापेक्षा चांदीच्या किंमतीत जास्त चढ उतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळं चांदीचे मार्केट देखील छोटे आहे.

काय खरेदी करणे जास्त फायदेशीर?

एक गुंतवणूकदाराने आपले बजेट, आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची क्षमता याच्यावर आधारित गुंतवणूक केली पाहिजे. लाँग टर्मसाठी सोन्यात गुंतवणूक फायदेशर ठरेल. तसेच चांदी हे इंडस्ट्रीयल डिमांडवर अवलंबून आहे. त्यामुळं गुंतवणूकदार किंमतीत मोठा चढ उतार पसंत करत नाहीत. त्यामुळे चांदीपेक्षा सोन्यात गुंतवणूक चांगला पर्याय ठरू शकतो. ज्या गुंतवणूकदारांना जोखीम पत्करणे आवडते ते चांदीत गुंतवणूक करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.