Amazon India: अॅमेझॉन इंडियाची मोठी घोषणा! कर्मचाऱ्यांसाठी आणि डिलिव्हरी नेटवर्कसाठी 2800 कोटींची गुंतवणूक; काय बदल होणार?

Amazon India Investment: 2800 कोटींच्या गुंतवणुकीतून भारतात ऑपरेशन्स विस्तार, AI तंत्रज्ञान आणि सामाजिक सुरक्षा योजनांना गती मिळणार
Amazon
AmazonPudhari
Published on
Updated on

Amazon India Investment: अॅमेझॉन इंडियाने भारतातील आपल्या ऑपरेशन्स नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितता व कल्याणासाठी तब्बल २८०० कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले की, ही गुंतवणूक डिलिव्हरी सेवा अधिक जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासोबतच हजारो कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, विमा आणि सामाजिक सुरक्षेसाठी वापरली जाणार आहे.

Amazon
Stock Market: पश्चिम बंगालमध्ये BJP सत्तेत आली तर शेअर बाजारात तेजी येणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

कंपनीच्या माहितीनुसार, ही गुंतवणूक भारतात २०३० पर्यंत ३५ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याच्या मोठ्या योजनेचा भाग आहे. या योजनेत व्यवसाय विस्तारासोबतच एआय आधारित डिजिटलायझेशन, निर्यात वाढ आणि रोजगार निर्मितीवर विशेष भर दिला जाणार आहे.

अॅमेझॉनने भारतात आपले फुलफिलमेंट सेंटर्स, सॉर्टेशन सेंटर्स आणि डिलिव्हरी नेटवर्क आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशातील मोठ्या शहरांसोबतच छोट्या शहरांमध्येही जलद डिलिव्हरी शक्य होणार आहे. कंपनी आपली क्विक कॉमर्स सेवा ‘Amazon Now’ देखील अधिक शहरांमध्ये विस्तारण्याच्या तयारीत आहे.

Amazon
Government Scheme: 5,000 रुपयांची पेन्शन, लाखो रुपयांचा विमा... आणि खर्च फक्त 500 रुपये, ही सरकारी योजना माहितेय का?

अभिनव सिंग, उपाध्यक्ष ऑपरेशन्स, Amazon India आणि ऑस्ट्रेलिया यांनी सांगितले की, “आमच्या नेटवर्कच्या केंद्रस्थानी कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्यासाठी आम्ही मोठी गुंतवणूक करत आहोत.”

कंपनीने कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी अनेक नवीन उपक्रम जाहीर केले आहेत. ‘प्रोजेक्ट आश्रय’ अंतर्गत डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी वातानुकूलित विश्रांती केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे. या केंद्रांमध्ये बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छ प्रसाधनगृहे, मोबाइल चार्जिंग पॉइंट आणि प्राथमिक उपचार सुविधा असतील. सध्या दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.

Amazon
LPG Price Hike: स्वयंपाकाच्या गॅसचे भाव आवाक्याबाहेर! घरगुती सिलेंडर ४० ते ५० रुपयांनी महाग होणार; जाणून घ्या दर

याशिवाय, लांब पल्ल्याच्या ट्रक चालकांसाठी आरोग्य सेवा वाढवण्यात येणार आहेत. कंपनी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे आयोजित करणार असून मानसिक आरोग्य आणि शारीरिक ताण कमी करण्यासाठी विशेष वेलनेस कार्यक्रम सुरू करणार आहे.

अॅमेझॉनने डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय आणि अपघाती विमा अधिक मजबूत करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर ‘समृद्धी’ उपक्रमाद्वारे कर्मचाऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे. यात ई-श्रम कार्ड, आरोग्य विमा, पेन्शन योजना आणि शैक्षणिक मदत यांचा समावेश असेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमाचा फायदा २ लाखांहून अधिक लोकांना होणार आहे.

Amazon
LPG New Rules: तुमचं LPG कनेक्शन बंद होऊ शकतं... झटपट करा हे काम; काय आहे सरकारचा नवीन नियम?

कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही कंपनी विशेष मदत करणार आहे. ‘प्रतिधी’ उपक्रमांतर्गत इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. दिव्यांग मुलांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

तंत्रज्ञानाच्या बाबतीतही कंपनी मोठी गुंतवणूक करणार आहे. एआय आणि मशीन लर्निंगच्या मदतीने डिलिव्हरी अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यावर भर दिला जाईल. ड्रायव्हर्सना सुरक्षित वाहन चालवण्याबाबत सूचना देणे, योग्य विश्रांतीची माहिती देणे आणि नियोजन अधिक अचूक करणे यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. अॅमेझॉनच्या या मोठ्या गुंतवणुकीमुळे भारतातील ई-कॉमर्स क्षेत्राला आणखी गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news