Layoffs 2026: सकाळी ईमेल पाहिला अन् नोकरी गेली; 'या' कंपनीने 250 कर्मचाऱ्यांना दिला नारळ, निर्णयामागचं कारण काय?

Amazon Layoffs 2026: अ‍ॅमेझॉनने आपल्या डिव्हाइस विभागातील सुमारे 250 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कर्मचाऱ्यांना सकाळी ईमेल आणि मेसेजद्वारे नोकरी गेल्याची माहिती देण्यात आली.
Amazon Layoffs 2026
Amazon Layoffs 2026Pudhari
Published on: 
Updated on: 

Amazon Layoffs 2026: अमेरिकेतील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने 250 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या डिव्हाइस विभागात ही कपात करण्यात आली असून, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटशी संबंधित पदांवर त्याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, संबंधित कर्मचाऱ्यांना सकाळीच ईमेल आणि मोबाईलवर मेसेज पाठवून नोकरी गेल्याची माहिती देण्यात आली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कंपनीच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अ‍ॅमेझॉनचा डिव्हाइस विभाग किंडल ई-रीडर, इको स्मार्ट स्पीकर आणि अ‍ॅलेक्साशी संबंधित उपकरणे तयार करतो. कंपनीने या बातमीला दुजोरा दिला असला, तरी अधिकृतपणे किती कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले, याची संख्या जाहीर केलेली नाही. मात्र, रॉयटर्सच्या अहवालात सुमारे 250 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर परिणाम झाल्याचे म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांना नोकरीवरून का काढलं?

अ‍ॅमेझॉनच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या कामकाजाची रचना आणि गरजा यांचा आढावा घेतल्यानंतर काही पदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे काम अधिक कार्यक्षम पद्धतीने करता येईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

या निर्णयाच्या एक दिवस आधी अ‍ॅमेझॉनने आपल्या इंजिनिअरिंग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक मेसेज प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI मुळे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या कामात मोठे बदल होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांनी या नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आणि त्यानुसार नवीन कौशल्ये शिकणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले होते.

विशेष म्हणजे, अ‍ॅमेझॉनने अलीकडेच अ‍ॅलेक्सावर आधारित पाच नवीन उपकरणे सादर केली आहेत. यामध्ये इको शो 16 स्मार्ट डिस्प्ले, अ‍ॅलेक्सा फोटो फ्रेम आणि इको टाइम घड्याळाचा समावेश आहे.

Amazon Layoffs 2026
Cow Slaughter Case: गोहत्या प्रकरणात तिघांना जन्मठेप! निकाल देताना न्यायालयाने वेद आणि मनुस्मृतीचा उल्लेख का केला? काय आहे प्रकरण?

AI मधील गुंतवणूक वाढतेय, पण नोकऱ्या घटतायत

अ‍ॅमेझॉनकडून कर्मचाऱ्यांना कमी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जानेवारीमध्ये कंपनीने 16 हजार पदे कमी करण्याची घोषणा केली होती. त्याआधी ऑक्टोबरमध्येही 14 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर परिणाम झाला होता. याशिवाय, कंपनीच्या रिटेल विभागातूनही सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Amazon Layoffs 2026
Best Indian Web Series: मिर्झापूर-द फॅमिली मॅन टॉप 3 मधून OUT! मग गेल्या गेल्या 10 वर्षांतील नंबर 1 वेब सीरिज कोणती? पाहा यादी

दुसरीकडे, अ‍ॅमेझॉन AI क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. कंपनी यंदा AI क्षेत्रात तब्बल 220 अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणूक करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्या कमी होण्याचे प्रमाण वाढत आहे. Layoffs.fyi च्या आकडेवारीनुसार, यंदा आतापर्यंत एक लाख 35 हजारांहून अधिक टेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे AI च्या वाढत्या वापरामुळे भविष्यात तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगाराच्या संधींवर किती परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news