Amazon Ecommerce: अ‍ॅमेझॉनचा मोठा प्लॅन! भारतात 6,64,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार; 38 लाख नोकऱ्या निर्माण होणार

Amazon Expands India E-commerce Exports: Amazonने 2030 पर्यंत भारतातून 80 अब्ज डॉलर्सची ई-कॉमर्स निर्यात उभारण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यासाठी AI टूल्सच्या मदतीने 1.5 कोटी लघुउद्योजकांना पाठबळ देण्यात येणार आहे.
Amazon Expands India E-commerce Exports
Amazon Expands India E-commerce ExportsPudhari
Published on
Updated on

Amazon Targets 80 Billion Dollar India E-commerce Exports by 2030:

भारताच्या ई-कॉमर्स निर्यातीला अ‍ॅमेझॉन मोठा हातभार लावणार आहे. कंपनीने 2030 पर्यंत भारतातून 80 अब्ज डॉलर्सची (6,64,000 कोटी) ऑनलाइन निर्यात करण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून, यामुळे सुमारे 38 लाख रोजगार निर्माण होतील, असा दावा अ‍ॅमेझॉन कडून करण्यात आला आहे.

अ‍ॅमेझॉनचे चीफ ग्लोबल अफेअर्स आणि लीगल ऑफिसर डेव्हिड ए. झापोल्स्की यांनी सांगितलं की, भारतातील छोट्या व्यापाऱ्यांना जागतिक बाजारात पोहोचण्यासाठी कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित टूल्स उपलब्ध करून देणार आहे. सुमारे 1.5 कोटी स्थानिक लघुउद्योजकांना या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे.

झापोल्स्की यांनी सांगितलं की, गेल्या दहा वर्षांत अ‍ॅमेझॉन मार्फत भारतातून सुमारे 20 अब्ज डॉलर्सची (1,66,000 कोटी) ई-कॉमर्स निर्यात झाली आहे. आता हा आकडा चौपट करण्याचा कंपनीचा विचार आहे. “सरकार ई-कॉमर्स निर्यातीवर भर देत आहे, हे सकारात्मक आहे. भारतीय विक्रेत्यांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आम्ही काम करणार आहोत,” असं त्यांनी सांगितलं.

रोजगारनिर्मितीवर मोठा भर

अ‍ॅमेझॉन सध्या भारतातील सर्वात मोठ्या रोजगारनिर्मात्या कंपन्यांपैकी एक आहे. 2024 मध्येच कंपनीमुळे थेट आणि अप्रत्यक्ष मिळून सुमारे 28 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या. 2030 पर्यंत हा आकडा 38 लाखांपर्यंत नेण्याचा कंपनीचा विचार आहे.

Amazon Expands India E-commerce Exports
AI Prediction: पुढील पाच वर्षांत IT सेवा बंद होणार; AI समिटआधी विनोद खोसला यांचा मोठा इशारा, नोकऱ्यांच काय होणार?

नव्या कामगार कायद्यांचं स्वागत

केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्यामुळे गिग व प्लॅटफॉर्म वर्कर्सना सामाजिक सुरक्षेच्या चौकटीत आणण्यात आलं आहे. याअंतर्गत आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कंपन्यांना सामाजिक सुरक्षा निधीत योगदान द्यावं लागणार आहे. अपघात विमा, आरोग्य सेवा, मातृत्व लाभ अशा योजना या निधीतून राबवल्या जातील. झापोल्स्की म्हणाले की, अ‍ॅमेझॉन या नव्या नियमांचा अभ्यास करत असून त्यानुसार आवश्यक बदल करत आहे.

कुरिअर निर्यातीवरील मर्यादा हटवल्याने फायदा

अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कुरिअर निर्यातीवरील 10 लाख रुपयांची मर्यादा हटवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे भारतीय विक्रेत्यांना मोठ्या किमतीच्या ऑर्डर्सही सहज पाठवता येणार आहेत. अ‍ॅमेझॉनच्या मते, या निर्णयामुळे लघुउद्योगांना मोठा फायदा होईल.

याशिवाय, परदेशी मार्केटप्लेसना फक्त निर्यातीसाठी भारतात माल साठवण्याची परवानगी देण्याचा प्रस्तावही सरकारच्या विचाराधीन आहे. हा निर्णय झाला तर भारतीय छोट्या विक्रेत्यांचा भांडवली खर्च कमी होईल आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश आणखी सोपा होईल.

Amazon Expands India E-commerce Exports
AI Revolution: AI मुळे 'टेक विश्वात काही तरी मोठं घडतंय', पुढील 5 वर्षांत मोठी उलथापालथ होणार; AI कंपनीच्या CEO चा इशारा

भारतावर विश्वास

अ‍ॅमेझॉनने आतापर्यंत भारतात 35 अब्ज डॉलर्सपेक्षा (2,90,500 कोटी) अधिक गुंतवणूक केली आहे. झापोल्स्की यांच्या मते, ही गुंतवणूक भारताच्या आर्थिक वाढीवर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे. ई-कॉमर्सपुरतंच नाही, तर लॉजिस्टिक्स, डिजिटल सेवा आणि AI क्षेत्रातही कंपनी विस्तार करण्याच्या तयारीत आहे.

एकूणच, AI तंत्रज्ञान, सरकारी धोरणांचा पाठिंबा आणि जागतिक बाजारातील संधी यांचा उपयोग करून अ‍ॅमेझॉन भारताला मोठं ई-कॉमर्स निर्यात केंद्र बनवण्याच्या दिशेने वेगाने पावलं टाकत आहे. याचा थेट फायदा देशातील लाखो लघुउद्योजक आणि तरुणांना होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news