

Aadhaar Card Update Rules 2025: नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होताच सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी काही महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. या नव्या नियमांचा थेट परिणाम बँकिंग आणि आधार सेवांवर होणार आहे. UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) कडून आधार सेवांमध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत.
या बदलांनुसार आता आधार कार्डधारक आपले नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि पत्ता घरबसल्या ऑनलाइन बदलू शकतात. यासाठी आधार केंद्रावर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. UIDAI ने ही सुधारणा नागरिकांना सोयीस्कर आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी केली आहे.
UIDAI ने आधारशी संबंधित सेवांच्या शुल्कामध्ये वाढ केली आहे. आता जर तुम्हाला बायोमेट्रिक अपडेट म्हणजे फिंगरप्रिंट, डोळ्यांचा स्कॅन (आइरिस) किंवा फोटो अपडेट करायचा असेल, तर त्यासाठी ₹125 इतके शुल्क आकारले जाईल. पूर्वी ही फी ₹100 होती.
तर डेमोग्राफिक अपडेटसाठी ₹75 शुल्क ठरवण्यात आले आहे. या अपडेटमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर अशा तपशीलांचा समावेश होतो. आधी या सेवेकरिता ₹50 शुल्क घेतले जात होते.
सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 अशी निश्चित केली आहे. जर तुम्ही या मुदतीत आधार–पॅन लिंकिंग पूर्ण केले नाही, तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचे पॅन कार्ड बंद होईल. त्यानंतर पॅनशी संबंधित कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाही.
UIDAI च्या नव्या नियमांनुसार, नाव, जन्मतारीख, पत्ता आणि मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी केंद्रावर जाण्याची गरज नाही. हे सर्व बदल ‘मायआधार’ पोर्टलवरून ऑनलाइन करता येतील. मात्र, त्यासाठी तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे.
या नव्या प्रणालीमुळे नागरिकांना वेळ, पैसा आणि त्रास वाचणार आहे. आधारशी संबंधित सर्व प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहेत.