8th Pay Commission Update: २.०, २.१५, २.२८ की २.५७ कोणता फिटमेंट फॅक्टर 'बेसिक' पगार लाखात घेऊन जाणार? जाणून घ्या संपर्ण गणित

मुख्य क्रेंद्रीय कर्मचारी NC-JCM यांनी आठव्या वेतन आयोगाकडे फिटमेंट फॅक्टर ३.८३३ ठेवण्याची शिफारस केली आहे.
8th Pay Commission Update
8th Pay Commission Updatepudhari
Published on: 
Updated on: 

8th Pay Commission Update: आठवा वेतन आयोग ७ ऑक्टोबरपासून बंगळुरू, कर्नाटकातील कर्मचारी संघटना आणि संबंधित लोकांशी बैठक करणार आहे. त्याचबरोबर आयोग वेगवेगळ्या विभागातील मंत्रालयातील कर्मचाऱ्यांशी संबंधीत डेटा गोळा करत आहे. आयोगाला रिपोर्ट तयार करण्यासाठी हा डेटा महत्वाचा आहे.

8th Pay Commission Update
8th Pay Commission : कोरोना काळातील रोखलेला 'डीए' अखेर खात्यात जमा होणार? : 8व्या वेतन आयोगाकडून मोठ्या निर्णयाची शक्यता

या फिटमेंट फॅक्टरची चर्चा

या रिपोर्टनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी आणि पेन्शनमध्ये बदल होणार आहे. ज्यावेळी सरकार रिपोर्टवर नोटिफिकेशन काढेल त्यावेळी कर्मचाऱ्यांना विलंबाचा एरियर आणि नव्या फिटमेंट फॅक्टरनुसार नवी वाढीव सॅलरी मिळणार आहे. वेगवेगळ्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीनुसार २.०, २.१५, २.२८ आणि २.५७ या फिटमेंट फॅक्टरची तर्चा सुरू आहे. जर यापैकी कोणता फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यावर लेवल ६ आणि ७ मधील कर्मचाऱ्यांनी बेसिक सॅलरी किती वाढणार हे पाहुयात.

8th Pay Commission Update
8th Pay Commission delay loss: ८ व्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेला उशीर झाल्यास कर्मचाऱ्यांचे 'किती' लाखांचे नुकसान होणार?

कर्मचारी संघटनांची मागणी काय?

मुख्य क्रेंद्रीय कर्मचारी NC-JCM यांनी आठव्या वेतन आयोगाकडे फिटमेंट फॅक्टर ३.८३३ ठेवण्याची शिफारस केली आहे. याचा अर्थ जर ही शिफारस मान्य केली तर सातव्या वेतन आयोगाच्या १८ हजार किमान बेसिक वेतन आठव्या आयोगात ६९,००० होईल. याचबरोबर AIDEF, FNPO आणि AINPSEF सारख्या संघटनांनी देखील ३.८३ च्या फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. दुसरीकडे IRTSA वेगवेगळ्या स्तरासाठी वेगवेगळे ५.० फिटमेंट फॅक्टरचा प्रस्ताव दिला आहे.

8th Pay Commission Update
8th Pay Commission Update: आठवा वेतन आयोग... केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनर्ससाठी 'ऑक्टोबर' महिना असणार महत्वाचा

दाट शक्यता कशाची?

AINSPEF चे राष्ट्रीय अध्यक्ष मनजीत सिंह पटेल यांनी सध्याचा महागाई भत्ता आणि वेतन याच्याशी जोडून पाहिलं तर आठव्या वेतन आयोगात २.१ फिटमेंट फॅक्टर होण्याची दाट शक्यता आहे. मात्र खरा फिटमेंट फॅक्टर ज्यावेळी सरकार नोटिफिकेशन लागू करणार त्याचवेळी समजणार आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत लेवल ६,७ आणि ८ यांची बेसिक सॅलरी ही अनुक्रमे ३५,४००, ४४,९००, ४७,००० इतकी आहे.

जर फिटमेंट फॅक्टर २.०, २.१५, २.२८ किंवा २.५७ असा लागू झाला तर तर लेवल ६,७ आणि ८ मधील कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी किती होणार याचा अंदाज घेऊयात.

8th Pay Commission Update
8th Pay Commission Update: बेसिक पगारातच महागाई भत्ता समाविष्ट होणार, ८ व्या वेतन आयोगाकडून आनंदाची बातमी मिळणार?

लेवल ६ ( सध्या ३५,४०० बेसिक सॅलरी)

२.० फिटमेंट फॅक्टर - ७०,८०० बेसिक पे

२.१५ फिटमेंट फॅक्टर - ७६,११० बेसिक पे

२.२८ फिटमेंट फॅक्टर - ८०,७१२ बेसिक पे

२.५७ फिटमेंट फॅक्टर - ९०, ९७८ बेसिक पे

लेवल ७ (सध्या ४४,९०० बेसिक पे)

२.० फिटमेंट फॅक्टर - ८९,८०० बेसिक पे

२.१५ फिटमेंट फॅक्टर - ९६, ५३५ बेसिक पे

२.२८ फिटमेंट फॅक्टर - १, ०२, ३७२ बेसिक पे

२.५७ फिटेमेंट फॅक्टर - १,१५,३९३ बेसिक पे

8th Pay Commission Update
8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगात अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार... बेसिक नाही HRA देखील दणकून वाढणार

लेवल ८ ( सध्या ४७,६०० बेसिक पे)

२.० फिटमेंट फॅक्टर - ९५,२०० बेसिक पे

२.१५ फिटमेंट फॅक्टर - १,०२,३४९ बेसिक पे

२.२८ फिटमेंट फॅक्टर - १,०८,५२८ बेसिक पे

२.५७ फिटेमेंट फॅक्टर - १,२२,३३२ बेसिक पे

टीप - हे सर्व आकडे अंदाजाने मांडले आहेत. खरा वाढलेला पगार आणि फिटमेंट फॅक्टर हा सरकार ज्यावेळी नोटिफिकेशन काढेल त्यावेळीच निश्चित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news