8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगात अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार... बेसिक नाही HRA देखील दणकून वाढणार

8th Pay Commission Update
8th Pay Commission UpdatePudhari
Published on
Updated on

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाबाबत देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अनेक कर्मचारी हे त्यांचा बेसिक पगार किती वाढणार याचे गणित मांडत आहेत. सध्या आयोगाने सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत विचार करत आहे. मात्र जाणकारांच्या मते आठव्या वेत आयोगात फक्त बेसिक पगार नाही तर हाऊस रेंट अलाऊन्स देखील वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

8th Pay Commission Update
8th Pay Commission : महागाई भत्त्याच्या सूत्रामध्ये मोठे बदल होणार..! केंद्रीय कर्मचाऱ्यांची नजर आठव्या वेतन आयोगावर

HRA थेट मूळ पगाराशी संबंधित

फिटमेंट फॅक्टरमध्ये कोणताही बदल किंवा वाढ झाल्यावर त्याचा थेट परिणाम हा भत्यांवर देखील पडत असतो. विशेष म्हणजे जे कर्मचारी मेट्रो सिटीमध्ये काम करत असतात त्यांना या HRA चा जास्त फायदा मिळत असतो आयोगाकडून शिफारस केल्या गेलेल्या फटमेंट फॅक्टरच्या आधारावर प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या हाऊस रेंट भत्त्यामध्ये हजारो रूपयाचा फरक पडू शकतो.

बँक बझारचे सीईओ आदिल शेट्टी यांच्यानुसार कर्माचाऱ्यांनी फक्त सुधारित मूळ पगारावरच लक्ष केंद्रित करू नये. ते म्हणाले की, 'आठव्या वेतन आयोगाबाबत मुख्य चर्चा ही मूळ वेतनाबाबत होणार आहे. त्यातील वाढ किती होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी तुमचा hra किती वाढणार आहे याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे.

HRA चे कॅलक्युलेशन हे बेसिक पगाराच्या टक्केवारी नुसार होते. त्यामुळं वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टरनुसार एकूण मासिक पगाराचे वेगवेगळे रिझल्ट येऊ शकतात.

8th Pay Commission Update
EPFO New Rule: EPFOचा मोठा निर्णय! 1,800 रुपयांपर्यंत PF योगदान अनिवार्य; पैसे काढण्याचे नियमही बदलले

कसा मिळणार HRA?

केंद्रीय कर्मचाऱ्यांनी तीन वेगवेगळ्या दरांद्वारे hra दिला जातो. यात शहरांची X,Y,Z अशा तीन श्रेणी केल्या आहेत. एक्स श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगाराच्या ३० टक्के एचआरए मिळतो. तर वाय श्रेणीतील शहरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना २० अन् झेड श्रेणीतील शहरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूळ पगाराच्या १० टक्के एचआरए मिळतो.

मात्र ही टक्केवरी सरकारी निर्णयानुसार भविष्यात बदलत राहते. जर सध्या आहे ती टक्केवारी कायम राहिली तर हा HRA भत्ता आपोआप वाढणार आहे. कारण त्याचे गणित हे मूळ वेतनाशी निगडीत असतं.

8th Pay Commission Update
PF NPS Rule Changes: सेव्हिंगचा गेम ओव्हर? PF-NPS मध्ये 3 मोठे बदल; निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता धोक्यात येणार

फिटमेंट फॅक्टर किती वाढवणार HRA?

लेवल १ कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विचार केला तर त्यांचे मूळ वेतन १८ हजार रूपये आहे. जर फिटमेंट फॅक्टर २.० झाला तर त्यांची बेसिक सॅलरी ही ३६ हजार होईळ. त्यानुसार एक्स श्रेणीतील कर्मचाऱ्यांना एचआरए हा १० हजार ८०० रूपये मिळणार आहे.

जर फिटमेंट फॅक्टर २.२८ झाला तर त्यांचा मूळ पराग हा ४१ हजार ०४० रूपये होईल त्यानुसार एचआरए १२ हजार ३१० रूपये इतका वाढेल. जर फिटमेंट फॅक्टर २.५७ पर्यंत पोहचला तर मूळ पगार ४६ हजार २६० रूपये होईल अन् एचआरने १३ हजार ८०० रूपयांपर्यंत जाईल.

8th Pay Commission Update
EPFO Update: PF खातेदारांसाठी मोठी बातमी! क्लेमपासून पेन्शनपर्यंतची सर्व कामे होणार झटपट; जाणून घ्या 10 मोठे बदल

अधिकाऱ्यांचा किती एचआरए वाढणार?

लेवल १० च्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56 हजार १०० रूपये आहे. जर फिटमेंट फॅक्टर २.० झाला तर त्यांचा मूळ पगार हा १.१२ लाख रूपये होईल. त्यामुळं त्यांचा एक्स शहरातील एचआरए ३३ हजार ६६० रूपये होईल.

जर फिटमेंट फॅक्टर २.२८ झाला तर एचआरए वाढून ३८ हजार ३७० रूपये होणार आहे. २.५७ फिटमेंट फॅक्टरवर मूळ पगार हा १.४४ लाख रूपये होईल. त्याचा एक्स श्रेणी शहरात एचआरए ४३ हजार २५० रूपये इतका होईल. तर वाय शहरात २८ हजार ८४० रूपये तर झेड शहरात १४ हजार ४२० रूपये एचआरए मिळेल.

8th Pay Commission Update
PF Withdrawal Via UPI-ATM: कामगार मंत्रालयाची गुड न्यूज! आता ATM, UPI द्वारे काढता येणार PF; जून संपण्यापूर्वीच मिळणार सुविधा

या सर्वात फिटमेंट फॅक्टर महत्वाचा

फिटमेंट फॅक्टर किती असणार हा नव्या वेतन आयोगात महत्वाचा फॅक्टर आहे. जेवढा फिटमेंट फॅक्टर जास्त जेवढे मूळ वेतन जास्त अन् त्याच्या संबंधित भत्ते देखील वाढणार आहेत.

कर्मचारी संघटनांनी २.५७ फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. जाणकारांच्या मते सरकार यापेक्षा कमी आकड्यावर समहत होऊ शकते. मिळालेल्या अनेक वृत्तानुसार २.० ते २.५७ फिटमेंट फॅक्टर राहण्याची शक्यता आहे. याबाबत अजून अंतिम निर्णय आलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news