8th Pay Commission delay loss: ८ व्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेला उशीर झाल्यास कर्मचाऱ्यांचे 'किती' लाखांचे नुकसान होणार?

8th pay commission implementation update: आठव्या वेतन आयोगाला नोव्हेंबर २०२५ पासून १८ महिन्यांचा मुदत देण्यात आली आहे.
8th Pay Commission Report Delay
8th Pay Commission Report Delaypudhari
Published on: 
Updated on: 

8th Pay Commission Report Delay: केंद्रीय कर्मचारी हे आठव्या वेतन आयोगाच्या रिपोर्टची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. आयोगाचा रिपोर्ट लागू होण्यास जेवढा उशीर होईल तेवढे कर्मचाऱ्यांचे होणारे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. अंदाजे जर फिटमेंट फॅक्टर २.१ नुसार मूळ पगार निश्चित झाला आणि आयोगाचा रिपोर्ट लागू होण्यास २५ महिन्यांचा उशीर झाला तर जवळपास अंदाजे होणारे नुकसान हे ३.३२ लाख रूपयांपर्यंतचे असू शकते. हा अंदाज फक्त लेवल - ७ च्या कर्मचाऱ्यांबाबतचा आहे.

8th Pay Commission Report Delay
8th Pay Commission Update: आठवा वेतन आयोग... केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनर्ससाठी 'ऑक्टोबर' महिना असणार महत्वाचा

आयोगाची डेटलाईन

आठव्या वेतन आयोगाला नोव्हेंबर २०२५ पासून १८ महिन्यांचा मुदत देण्यात आली आहे. त्यांना १८ महिन्यांच्या आत रिपोर्ट सादर करायचा आहे. रिपोर्ट सादर झाल्यानंतर त्याची समीक्षा आणि त्यानुसार अधिसूचना जारी करायला काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. जाणकारांच्या मते आठव्या वेतन आयोगाकडून रिपोर्ट आल्यानंतर तो लागू करण्यासाठी ३ ते ६ महिन्यांचा जास्तीचा वेळ लागू शकतो.

जर आठवा वेतन आयोग लागू होण्यास उशीर झाला तर त्याचा परिणाम हा फक्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाच्या तारीखेवरच नाही तर मिळणाऱ्या भत्त्यांवर देखील होण्याची शक्यता आहे.

8th Pay Commission Report Delay
8th Pay Commission Update: बेसिक पगारातच महागाई भत्ता समाविष्ट होणार, ८ व्या वेतन आयोगाकडून आनंदाची बातमी मिळणार?

आठवा वेतन आयोग फायदा कधीपासून?

७ व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपला आहे. अशात आठवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन हे १ जानेवारी २०२६ पासून प्रभावी मानले जाते. म्हणजे आयोगाचा रिपोर्ट लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२६ पासून अधिसूचनेच्या तारखेपर्यंत मूळ वेतनाचा एरिअर्स मिळू शकतो.

8th Pay Commission Report Delay
8th Pay Commission : पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! ४० वर्षांचे जुने आर्थिक गणित बदलण्याची शक्यता

नुकसान होणार?

गेल्या वेतन आयोगांची व्यवस्था पाहिली तर एरियरचे पेमेंट हे प्रामुख्याने बेसिक पेवर आधारित होते. डीए, एचआरए किंवा ट्रान्सपोर्ट अलाऊन्स सारखे भत्ते त्यात समाविष्ट केले जात नव्हते. त्यामुळेच रिपोर्ट लागू होण्यास उशीर झाला तर त्याचा आर्थिक फटका कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

8th Pay Commission Report Delay
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाची एक शिफारस अन् १८ हजाराचा बेसिक पे पोहचणार ७२ हजारावर

लेवल - ७ कर्माचाऱ्यांचे किती नुकसान?

जर अंदाज लावला गेला तर तर लेवल - ७ च्या कर्मचाऱ्यांची सध्याची बेसिक सॅलरी ही ४४ हजार ९०० रूपये मानली गेली आहे. जर आठव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर २.१ लागू झाला तर बेसिक पे ९४ हजार २९० रूपयांपर्यंत पोहचेल.

म्हणजे सध्याचा बेसिक पे आणि अंदाजे नवीन बेसिक पे यांच्यात ४९,४९० प्रति महिना अंतर पडले. एक्स श्रेणीच्या शहरांमध्ये २४ टक्के एचआरए मानला तर सध्याचा एचआरए जवळपास १० हजार ७७९ रूपये होतो. फिटमेंट फॅक्टर २.१ लागू झाला तर हाच एचआरए जवळपास २२ हजार ६३० रूपये होईल. तर ट्रॅव्हलिंग अलाऊन्स हा अंदाजे ७ हजार ५६० रूपये होईल.

8th Pay Commission Report Delay
8th Pay Commission latest : ८व्या वेतन आयोगाचा मोठा धमाका! पेन्शन पुनर्स्थापनेची मुदत ४ वर्षांनी घटणार?

रिपोर्ट मे २०२७ मध्ये लागू झाला तर...

जर आठवा वेतन आयोगाचा रिपोर्ट मे २०२७ मध्ये लागू झाला तर जवळपास १७ महिन्यांचा विलंब होईल. त्या दृष्टीकोणातून लेवल ७ कर्मचाऱ्यांचे जवळपास २.९९ लाखांचे नुकसान होईल.

जर ऑगस्ट २०२७ मध्ये लागू झाला तर

जर आठवा वेतन आयोगाचा रिपोर्ट ऑगस्ट २०२७ मध्ये लागू झाला तर हा विलंब जवळपास २० महिन्यांचा होऊ शकतो. अशा स्थितीत नुकसान हे २.६८ लाखांचे होईल.

जर जानेवारी २०२८ मध्ये लागू झाला तर

जर आठवा वेतन आयोग जानेवारी २०२८ मध्ये लागू झाला तर विलंब हा जवळपास २५ महिन्यांचा होईल आणि अंदाजे नुकसान हे जवळपास ३.३२ लाख रूपयांपर्यंत पोहचू शकते.

टीप- हे सर्व आकडे अंदाजे वर्तवण्यात आले आहेत होणारं नुकसान हे आठव्या वेतन आयोगाद्वारे ठरवलेला फिटमेंट फॅक्टर, एचआरए आणि टीपीटीए तसेच सरकार कधी अधिसूचना काढते आणि त्यात कोणत्या अटी असतात त्यावर अवलंबून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news