वेध शेअर बाजाराचा : सरकारला डिव्हिडंड; गुंतवणूकदार मालामाल! | पुढारी

वेध शेअर बाजाराचा : सरकारला डिव्हिडंड; गुंतवणूकदार मालामाल!

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा.लि.

सोमवार, दिनांक 20 मे रोजी मुंबईतील मतदानामुळे भारतातील शेअर बाजार बंद होते. दि. 21 व 22 मे रोजी किरकोळ तेजी दाखविणार्‍या बाजारात गुरुवारी दि. 23 मे रोजी एक सर्वंकश जोरदार तेजी आली. आणि याला कारण होते, बुधवारी बाजार बंद झाल्यावर रिझर्व्ह बँकेने सरकारला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी 2.11 लाख कोटी रुपये इतका विक्रमी लाभांश जाहीर केल्याची बातमी! हा लाभांश विक्रमी तर आहेच; परंतु सरकारला लाभांश अपेक्षित होता रु. 1 लाख कोटी म्हणजे अपेक्षित आकड्याच्या दुप्पटीहून अधिक लाभांश रिझर्व्ह बँकेने दिला. या घडामोडीने बाजारात तेजीचे उधाण आले नसते तरच नवल!

सन 2025 साठी या सरकारने मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात वित्तीय तूट 5.8 वरून 5.1 वर आणण्याचा निर्धार व्यक्त केला होता. ही तूट कमी करण्यासाठी या लाभांशाच्या रकमेची सरकारला मोठीच मदत होईल.

आता भारतीय शेअर बाजाराच्या बाबतीत आणखी एक अभूतपूर्व घटना पाहा. भारताचा Mcap to GDP रेशो मागील पंधरा वर्षांच्या इतिहासात उच्चांकावर आहे आणि तो आहे 140.2 टक्के. भारताचा सन 2023-24 चा GDP चा आकडा आहे 296.6 ट्रिलियन रुपये आणि बीएसईवर ट्रेड होणार्‍या एकूण कंपन्यांचे एकत्रित भाग भांडवल (Market Cap) आहे. 414.4 ट्रिलियन रुपये सन 2007 मध्ये हा रेशो 149.4 टक्के होता. सध्याचा भारतीय शेअर बाजारातील आयपीओंची संख्या आणि तेजी पाहता, सन 2007 चा विक्रमही लवकरच मोडला जाईल यात शंका नाही. कारण 4 ट्रिलियन डॉलर्स M-Cap चा आकडा BSE ने 29 नोव्हेंबर 2023 रोजी गाठला होता. त्यानंतर केवळ 117 दिवसात यामध्ये 1 ट्रिलियनची भर पडली आहे. हा वेग चकित करणारा आहे.

आपण मागच्याच लेखात पाहिले की, मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच परदेशी गुंतवणूक संस्थांनी (FII) भारतीय बाजारात विक्रीचा मारा सुरू केला होता. निवडणूक निकालांची अनिश्चितता तसेच चीनमध्ये मंदीमुळे स्वस्त झालेल्या शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी, ही दोन कारणे त्यामागे होती. परंतु ऋखखी च्या या अखंड विक्रीच्या मार्‍याला दिनांक 23 च्या तेजीच्या उधाणाने खीळ बसली आणि त्यांनी रु. 4671 कोटींची निव्वळ खरेदी केली. सोने पे सुहागा म्हणतात ते याला!

या धुमधडाक्यात निफ्टीने 23000 चा आकडा पार केला (23026.40) आणि सेन्सेक्सने 75000 चा (75636.50) रेल्वे, जहाज आणि जमीन बांधणी कंपन्यांची आठवडा गाजवला. RVNL, Mazgaon Dock या शेअर्सनी 30 टक्क्यांहून अधिक; तर हिंदुस्तान झिंक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, बीईएमएल या शेअर्सनी जवळपास 25 टक्के रिटर्नस् दिले; परंतु या आठवड्याचे सामनावीर ठरले (GRSE) आणि (BDL) हे दोन्ही शेअर्स 47 टक्के वधारले.

यापैकी GRSE म्हणजे Garden Reach Shipbuilders and Engineers भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतगर्र्त ती काम करते. इंडियन नेव्ही आणि इंडियन कोस्ट गार्डसाठी लागणार्‍या जहाजांची निर्मिती ती करते. शिवाय युद्धनौका निर्यात करणारी ती पहिली भारतीय कंपनी आहे. निव्वळ नफ्यात 104 टक्के वाढीमुळे या कंपनीचा शेअर या आठवड्यात वधारला. BDL म्हणजे Bharat Dynamics ची चर्चा आपण बर्‍यांच वेळा केली आहे. कंपनीने आपल्या शेअरचे 1:2 या प्रमाणात विभाजन केल्यामुळे हा शेअर वाढला.

B या रिअल इस्टेट कंपनीने वर्षभरातील उच्चांक प्रस्थापित केला (रु. 1300) दक्षिण भारतातील हा कंपनी आता हळूहळू सगळीकडे पाय पसरत आहे.

मागील आठवड्यातील मंगळवारी निवडणुकांचे निकाल आहेत. गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी निकालांची प्रतीक्षा करणे चांगले आणि ट्रेडर्सनीही Heavy Trading या आठवड्यात टाळावे. ‘सर सलामत तो पगडी पचास’ अशी हिंदीत एक म्हण आहे. त्याप्रमाणे शेअर बाजारात Capital सलामत तो Chances पचास!

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी ही कमाल करून दाखवली. काही प्रगत राष्ट्रांच्या मध्यवर्ती बँका तोटा दाखवत असतानाही! रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्नात सिंहाचा वाटा आहे, तिने प्रगत राष्ट्रातील Risk Free Sovereign Securities मध्ये केलेल्या गुंतवणुकीचा! त्यातही निम्म्याहून अधिक गुंतवणूक अमेरिकेच्या ट्रेझरी बिल्समध्ये होती. कमर्शिअल बँकांना रेपो अ‍ॅग्रीमेंटअंतर्गत केलेल्या अल्पकालीन वित्त पुरवठ्यात मागील वर्षात मोठी वाढ झाली. त्यावरील व्याजाचे उत्पन्न रिझर्व्ह बँकेला भरपूर मिळाले. आणि शेवटी डॉलर-रुपया विनिमय दर नियंत्रित ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पूर्वी खरेदी केलेले (रु. 78 दराने) डॉलर्स विकले. (रु. 83 दराने) सन 2023-24 मध्ये रिझर्व्ह बँकेने 41 बियन एवढे डॉलर्स खरेदी केले होते. यावरून त्यातून मिळालेल्या प्रचंड उत्पन्नाची कल्पना यावी.

हेही वाचा : 

Back to top button