Gold Price Today | सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर! जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर | पुढारी

Gold Price Today | सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर! जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

पुढारी ऑनलाईन : सोन्याच्या दरात तेजी कायम आहे. आज मंगळवारी (दि.९) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुद्ध सोन्याचा दर २२८ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ७१,५०७ रुपयांवर पोहोचला. सोमवारी शुद्ध सोन्याचा दर ७१,२७९ रुपयांवर बंद झाला होता. मंगळवारी तो ७१,५०७ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ८१,७०० रुपयांवर गेला आहे. (Gold Price Today)

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, मंगळवारी शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ७१,५०७ रुपये, २२ कॅरेट ६५,५०० रुपये, १८ कॅरेट ५३,६३० रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४१,८३२ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ८१,७०० रुपयांवर खुला झाला.

सोने दरवाढीचे कारण काय?

फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची आशा आणि जागतिक मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी वाढवल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत तेजी आली आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेला भू-राजकीय तणाव हेदेखील सोन्याच्या किमतीत वाढ होण्यामागचे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. सुरक्षित गुंतवणूक (सेफ हेवन मालमत्ता) म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. तसेच भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु असल्याने सोन्याला मागणी वाढली आहे. यामुळे मार्च २०२४ पासून सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात तर सोन्याने दराचे सर्व उच्चांक मोडले आहेत.

शुद्ध सोन्याची पारख कशी कराल?

सराफा बाजारात २४ कॅरेट हे शुद्ध सोने मानले जाते. पण, दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर होतो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे नमूद केलेले असते. (Gold Price Today)

हे ही वाचा :

 

 

Back to top button