Stock Market Updates | RBI MPCच्या निर्णयापूर्वी सेन्सेक्स २०० अंकांनी वाढला | पुढारी

Stock Market Updates | RBI MPCच्या निर्णयापूर्वी सेन्सेक्स २०० अंकांनी वाढला

पुढारी ऑनलाईन : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) पतविषयक धोरण समिती (MPC) आज गुरुवारी रेपो ‍‍‍रेटबाबतचा निर्णय जाहीर करेल. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने तेजीत सुरुवात केली आहे. सेन्सेक्स २०० अंकांनी वाढून ७२,३८० वर तर निफ्टी ७० अंकांच्या वाढीसह २२ हजारांवर खुला झाला आहे. (Stock Market Updates)

सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड टॉप गेनर आहे. हा शेअर्स ५ टक्के वाढीसह २८१ रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याचबरोबर इंडसइंड बँक, एसबीआय, एचसीएल टेक, एम अँड एम, टीसीएस हे शेअर्सही वधारले आहेत. तर आयटीसी, मारुती, बजाज फायनान्स हे शेअर्स घसरले आहेत.

निफ्टीवर पॉवर ग्रिड, बीपीसीएल, इंडसइंड बँक, हिंदाल्को, एचसीएल टेक हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर मारुती, टाटा कन्झ्युमर, ब्रिटानिया, आयशर मोटर्स, एशियन पेंट्स हे लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. (Stock Market Updates)

आरबीआयच्या धोरणात्मक निर्णयापूर्वी बँकिंग, फायनान्स आणि ऑटो यासारख्या दर संवेदनशील क्षेत्रांमध्ये सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसून आली. तर, निफ्टी रियल्टी निर्देशांक लाल रंगात होता.

हे ही वाचा :

 

Back to top button