वेध शेअर बाजाराचा : तेजीच्या उंबरठ्यावर भारत | पुढारी

वेध शेअर बाजाराचा : तेजीच्या उंबरठ्यावर भारत

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा.लि.

टीसीएस, इन्फोसीस, रिलायन्स, एसबीआय हे भारतीय शेअरबाजारातील असे मोहरे आहेत. जे एकहाती बाजाराची दिशा ठरवूही शकतात आणि फिरवूही शकतात. याची प्रचिती शुक्रवारी आली. टीसीएस आणि इन्फोसीस यांचे 2024 च्या तिसर्‍या तिमाहीचे निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर झाले आणि त्यांनी शुक्रवारी बाजाराला सार्वकालीक उच्चांकावर नेऊन ठेवले. 21928.25 हा निफ्टीचा तर 72720.96 हा सेन्सेक्सचा उच्चांक शुक्रवारी गाठण्यात आला आणि मार्केटची गती अशी आहे की, सोमवारी बहुप्रतीक्षित 22 हजारांचा महत्त्वाचा टप्पा निफ्टी ओपनिंगलाच पार करेल.

असे काय होते टीसीएस आणि इन्फोसीसच्या निकालांमध्ये? बाजारतज्ज्ञांकडून टीसीएसबद्दल अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती की, नेट प्रॉफीट 11,446 कोटी रुपये असेल, तर उत्पन्न रु. 60119 कोटी असेल. प्रत्यक्षात उत्पन्नामधे फक्त 4 टक्के वाढ होऊन ते रु. 60583 कोटी आहे. उलट नफ्यामध्ये अंदाजापेक्षा घटच झाली तो केवळ दोन टक्के वाढून 11058 कोटी रु. झाला.

इन्फोसिसच्या निव्वळ नफ्यात तर सात टक्के घट झाली. उत्पन्नात केवळ 1.3 टक्के वाढ झाली. इतक्या सपाट परफॉर्मन्सनंतरही या दोन शेअर्सनी बाजाराला उच्चांकावर नेऊन ठेवले. आम्ही काही Large Deals वर काम करत आहोत जी पुढे ega Deals होऊ शकतात आणि कंपनीची Qualified Pipeline वाढली आहे. असे TCS चे COO एन गणपती सुब्रमण्यम यांनी सांगितले. त्यांच्या या आशावादावर आणि सप्टेंबर ते डिसेंबर ही तिमाही IT सेक्टरसाठी खराब काळ असतो, तरीही या दोन कंपन्यांनी बरे निकाल जाहीर केले. या दोन गोष्टींमुळे बाजारखूष झाला असावा. निफ्टी IT इंडेक्स या आठवड्यात 6.14 टक्के वाढला. इन्फोसीस, टीसीएस, एचसीएल टेक, एलटीआय, माईंड ट्री पर्सिस्टट, कोफोर्ज या शेअर्सनी दमदार कामगिरी केली. कोफोर्ज आणि एचसीएल टेक हे IT Sector चे सप्ताहाचे मानकरी ठरले.

निफ्टी रिअ‍ॅल्टीची घोडदौड अखंड सुरूच आहे. DLF, Lodha, Godrej Properties, Srvan Energy या शेअर्सनी आठवड्यात 52 Week High चा उच्चांक गाठला. Srvan Energy चा शेअर 28 मार्च 2023 रोजी रु. 192.65 होता तो केवळ दहा महिन्यांत जवळपास दोनशे टक्क्यांनी वाढून शुक्रवारी 562.15 रुपये झाला. DLF ने 800 चा टप्पा पार केला आणि मागील लेखात म्हटल्याप्रमाणे एक हजाराला स्पर्श करण्यास तो आतुर आहे.

या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे एरव्ही कधीही चर्चेत नसणार्‍या Media Sector Mo Network 18 आणि TV 18 Broadcast हे दोन शेअर्सच सप्ताहात चांगलेच वाढले Network 18 चा शेअर (रु.124.20) साडेसदतीस टक्क्यांनी वाढला, तर TV 18 Broadcast (रु.64.50) हा शेअर्स सव्वाबावीस टक्क्यांनी वाढला भरघोस वाढलेल्या इतर शेअर्सची यादी खालीलप्रमाणे :-

Alok Industries – रु. 1685.60 (24.95%)
Trident – रु. 47.50 (24.02%)
Avanti Feed – रु.545.30 (22.65%)
Ease My Trip – रु. 49.65 (21.54%)
Motilal Oswal FS – रु. 1557.20 – (20.93 %)

तिसर्‍या तिमाहीच्या कंपन्यांच्या निकालांचा हंगाम आहे. टीसीएस आणि इन्फोसिसप्रमाणे इतर आयटी कंपन्यांचे निकाल चांगले (?) लागले, तर बाजारासाठी उंच माझा झोका अशी परिस्थिती होईल. पाठोपाठ NMDC, GMDC, Coal India या खाण कंपन्यांचे निकाल अभूतपूर्व येतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. विशेषतः NMDC च्या शेअरमध्ये नेत्रदीपक तेजी येईल. रु.211.3 वर असणारा हा शेअर आगामी वर्षात रु. 300 पर्यंत गेला, तर आश्चर्य वाटायला नको. रु. 635.25 वर असणारा SBI हा शेअर गेले वर्षभर रखडतो आहे. त्याचेही चांगले निकाल अपेक्षित आहेत जे या शेअरमध्ये जान आणतील.

तिसर्‍या तिमाही निकालांपाठोपाठ Budjet Rally येईल. Railway Iufra, Fertilizers या शेअर्सना जोरदार मागणी येईल. Defence Sector मधील शेअर्सही प्रकाशात येतील. Green Energy शेअर्सचा बोलबाला होईल. त्याद़ृष्टीने RVNL, Railtel, L&T, RCF, Bharat, Forge Bharat Dynamics या शेअर्सकडे लक्ष ठेवावे. ही रॅली लोकसभा निवडणुकांपर्यंत अशीच सुरू राहील.

Back to top button