Stock Market Closing Bell | बाजाराचा मूड बिघडला! सेन्सेक्स ६७० अंकांनी घसरला, नेमकं कारण काय? | पुढारी

Stock Market Closing Bell | बाजाराचा मूड बिघडला! सेन्सेक्स ६७० अंकांनी घसरला, नेमकं कारण काय?

पुढारी ऑनलाईन : एफएमसीजी क्षेत्रात झालेल्या जोरदार विक्रीच्या माऱ्यामुळे आज सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली. यामुळे सेन्सेक्स ६७० अंकांनी घसरून ७१,३५५ वर बंद झाला. तर निफ्टी १९७ अंकांनी घसरून २१,५१3 वर बंद झाला. क्षेत्रीय पातळीवर एफएमसीजी, फार्मा आणि मेटल प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरले, तर पॉवर आणि रियल्टी निर्देशांक प्रत्येकी ०.६ टक्क्यांनी वाढले. एफसीजी (FMCG) व्यतिरिक्त PSU बँका आणि मेटल क्षेत्रातदेखील विक्रीचा जोर दिसून आला. वरच्या स्तरावर नफावसुलीचीही बाजारात दबाव राहिला. (Stock Market Closing Bell)

संबंधित बातम्या 

सेन्सेक्स आज ७२,११३ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७१,५०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर एसबीआय, हिंदुस्तान युनिलिव्हर, एम अँड एम, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, टीसीएस, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, विप्रो, आयटीसी हे शेअर्स टॉप लूजर्स होते. तर एचसीएल टेक, पॉवर ग्रिड, एनटीपीसी हे शेअर्स काही प्रमाणात घसरले.

एनएसई निफ्टी ५० निर्देशांक २१,७४७ वर खुल झाला होता. त्यानंतर निफ्टी २१,६०० च्या खाली आला. निफ्टीवर यूपीएल, डिव्हिज लॅब, एसबीआय, एसबीआय लाईफ, नेस्ले इंडिया हे टॉप लूजर्स ठरले. तर अदानी पोर्ट्स, एचसीएल टेक, ओएनजीसी, पॉवर ग्रिड, बीपीसीएल हे वाढले.

गुंतवणूकदारांची सावध भूमिका

भारतीय शेअर बाजारात आजच्या व्यवहारात विक्रीचा मारा झाल्याने घसरण झाली. गुंतवणूकदारांचे अमेरिकेच्या महागाईवाढीच्या आकडेवारीकडे लक्ष लागले आहे आणि गुरुवारी सुरू होणाऱ्या कमाई हंगामापूर्वी सावध भूमिका घेणे पसंत केले. एफएमसीजी, पीएसयू बँक निर्देशांक प्रत्येकी सुमारे १ टक्क्यांनी घसरले. (Stock Market Closing Bell)

‘या’ वाईन कंपनीच्या शेअर्सची धमाल, १५ टक्क्यांनी वाढला

जागतिक ब्रोकिंग फर्म CLSA ने स्टॉक अपग्रेड केल्यानंतर आणि टार्गेट प्राइस वाढवल्यानंतर भारतातील वाईनची सर्वात मोठी उत्पादक आणि विक्रेता कंपनी सुला विनयार्ड्सचे शेअर्स (Sula Vineyards Share Price) आज १५ टक्क्यांनी वाढून ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ६३९.४५ रुपयांवर पोहोचले. द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकारने वाईन उद्योग प्रोत्साहन योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, CLSA ने म्हटले आहे की सबसिडी पुन्हा मिळण्याने व्हॉल्यूम संधीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यानी सुलाची टार्गेट प्राइस प्रति शेअर ८६३ रुपयांवरून ५७१ रुपये प्रति शेअर केली आहे. गेल्या एका वर्षात हा शेअर्स दुपटीने वाढला आहे.
महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना पाच वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देणे, सुका मेवा बनविणे तसेच पर्यायी उत्पादनांती निर्मिती करण्यासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन देण्याची सुरु करण्यात आली आहे. वाईन उद्योग विकसित करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार असल्याचे महाराष्ट्र सरकारचे म्हटले आहे.

परदेशी गुंतवणूदार

एक्सचेंज डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) मागील सत्रात १,६९६.८६ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली होती, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) ३,४९७.६२ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

Back to top button