Economics news : अर्थवार्ता

Economics news : अर्थवार्ता
Published on
Updated on
  • गतं सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये अनुक्रमे एकूण 20.60 अंक व 214.11 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक 21710.8 अंक तसेच 72026.15 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 0.09 टक्क्यांची तर सेन्सेक्समध्ये 0.3 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे भांडवल बाजारमूल्य 374.48 लाख या विक्रमी पातळीवर पोहोचले. ( Economics news )

निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढ होणार्‍या समभागांमध्ये या सप्ताहात अदानी पोर्टस् (12.7 टक्के), ओएनजीसी (5.6 टक्के), अदानी एन्टरप्राईझेस (5.5 टक्के), बजाज फायनान्स (5.2 टक्के), टाटा कन्झ्युमर (3.3 टक्के) यांचा समावेश झाला तर सर्वाधिक घट दर्शवणार्‍या कंपन्यांमध्ये आयशर मोटर्स (-6.4 टक्के), जेएसडब्ल्यू स्टील (-5.8 टक्के), एल अँड टी माईंड ट्री (-5.5 टक्के), महिंद्रा अँड महिंद्रा (-5.1 टक्के), अल्ट्राटेक सिमेंट (-4.6 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला. मध्य पूर्वेमध्ये चालू असणार्‍या इस्राईल आणि हमास यांच्यामधील तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे सेक्रेटरी अँटनी ब्लिंकन यांचा मध्यपूर्व देशात दौरा प्रलंबित असून यामध्ये तोडगा निघाल्यास जगभरातील भांडवल बाजारासाठी ही दिलासादायक बातमी ठरेल आणि पुढील दिशा निश्चित होईल.

  • लाल समुद्रात व्यापारी जहाजांवर चालू असणार्‍या समुद्री चाच्यांच्या जाचामुळे समद्रमार्ग व्यापारात अडथळे. यापूर्वीच चालू असणार्‍या मध्य पूर्वेतील इस्राईल आणि हमास युद्धामुळे शुक्रवारच्या सत्रात खनिज तेल (ब्रेंट क्रुड) 1.17 डॉलर प्रतिबॅरल वधारून 78.76 डॉलर प्रतिबॅरल किमतीवर पोहोचले. अमेरिकेचे डब्ल्यूटीआय क्रुड (2.24 टक्के) 1.62 डॉलर प्रतिबॅरल वधारून 73.81 डॉलर प्रतिबॅरल किमतीवर पोहोचले.
  • राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केलेल्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारताचा अर्थव्यवस्था वाढीचा दर 7.3 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी अर्थव्यवस्था विकासदर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला होता. डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने हा 6.5 टक्क्यांचा अंदाज बदलून 7 टक्के केला; परंतु आता सांख्यिकी विभागाने सर्वाधिक 7.3 टक्क्यांची अर्थव्यवस्था वाढ अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक म्हणजे 7.2 टक्के दराने वाढली होती. नॉमिनल जीडीपी चालू आर्थिक वर्षात 8.9 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
  • 'असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस्' (अ‍ॅम्फी)च्या वर्गवारीनुसार (उरींशसेीू) जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या समभागाचा समावेश लार्ज कॅम या प्रकारात करण्यात आला. भांडवल बाजारमूल्यद़ृष्ट्या भारतातील सर्वात मोठ्या 100 कंपन्यांचा समावेश लार्ज कॅप प्रकारात होतो. 67 हजार कोटींपेक्षा अधिक भांडवल बाजारमूल्य असलेल्या कंपन्यांचाच समावेश लार्ज कॅप प्रकारात केला जाऊ शकतो. याचप्रमाणे टाटाटेक, जेएसडब्ल्यू, इन्फ्रा, आयआरईडीए या कंपन्यांचा समावेश यांचा समावेश मिडकॅप या प्रकारात केला जाणार. देशातील भांडवल बाजारमूल्यद़ृष्ट्या सर्वात मोठ्या 101 ते 250 क्रमांकाच्या कंपन्यांचा समावेश मिडकॅप प्रकारात केला जातो. फेब्रुवारीपासून हे समावेश केले जातील. तसेच जुलैनंतर या वर्गवारीची पुनर्रचना केली जाईल.
  • अदानी समूहाविरुद्धचा तपास बाजार नियामक यंत्रणा सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)कडून केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय अथवा एसआयटीकडे देण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई. तीन न्यायाधीश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. या संबंधीचा तपास सेबीने पुढील तीन महिन्यांत संपवावा, असे आदेश देण्यात आले आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये हिंडेनबर्ग या अमेरिकेच्या एका शोधपत्रिकेने अदानीविरोधात अहवाल प्रसृत केला. यामुळे अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग कोसळून गुंतवणूकदारांचे नुकसान झाले याची सखोल चौकशी सीबीआयकडून व्हावी, अशी मागणी करण्यात येत होती; परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली असून अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
  • भारताची निर्मिती उद्योगक्षेत्रातील प्रगती दर्शवणारा निर्देशांक मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय मागील 18 महिन्यांच्या न्यूनतम स्तरावर आला. डिसेंबर महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय 56 वरून 54.9 वर खाली आला. एकूण ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीचा विचार करता हा पीएमआय सरासरी 55.5 इतका झाला. मागील सहा तिमाहीतील हा सर्वात न्यूनतम आकडा आहे.
  • डिसेंबर महिन्यात भारतातील जीएसटी संकलन 1 लाख 65 हजार कोटींवर पोहोचले. मागील वर्षाच्या तुलनेत यात 10.3 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. चालू आर्थिक वर्षात सातव्यांदा जीएसटी संकलनाने 1 लाख 60 हजार कोटींचा टप्पा पार केला.
  • परदेशातून भारतीय रोखे बाजारात येणार्‍या निधीमध्ये भरघोस वाढ. 2023 या वर्षात परदेशातून एकूण 59800 कोटींची गुंतवणूक सरकारी रोख्यांमध्ये करण्यात आली. यापैकी सुमारे 35 हजार कोटी (4.2 अब्ज डॉलर्स)ची गुंतवणूक ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत करण्यात आली. जेपीमॉर्गन या परदेशी बलाढ्य गुंतवणूकदार उद्योग समूहाने भारतीय रोखे बाजारात गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेतल्याने शेवटच्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक आली. मागील 6 वर्षांतील रोखे बाजारातील परदेशी गुंतवणुकीचा हा उच्चांक आहे.
  • 'नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन'च्या माहितीनुसार यूपीआय व्यवहार मूल्य (णझख ढीरपीलींळेप तरर्श्रीश) डिसेंबर महिन्यात उच्चांकी पातळीवर पोहोचले. मागील वर्षीच्या तुलनेत डिसेंबरमध्ये व्यवहारमूल्यात तब्बल 42.2 टक्क्यांची वाढ होऊन यूपीआय व्यवहार 18 लाख 20 हजार कोटींवर पोहोचले. नोव्हेंबरमध्ये हेच व्यवहारमूल्य 17 लाख 40 हजार कोटी होते. तसेच 'ई रुपया' या नव्या डिजिटल चलन माध्यमातून दैनंदिन व्यवहार 10 लाखांपर्यंत पोहोचले. मध्यवर्ती बँक डिजिटल चलन 'सीबीडीसी' म्हणजे ई रुपया मागील वर्षभरात चलनात आला. मागील महिन्यात काही खासगी तसेच सरकारी बँकांनी आपले वेतनेतर लाभ कर्मचार्‍यांपर्यंत ई रुपया चलन स्वरूपात 'सीबीडीसी वॉलेट'मध्ये जमा केले.
  • दूरसंचार क्षेत्रात (टेलिकॉम स्पेस) पायाभूत सेवा पुरवणारी अमेरिकन टॉवर कॉर्पोरेशन (एटीसी)चा भारतातील व्यवसाय ब्रुकफिल्ड अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी 2.5 अब्ज डॉलर्सना (21 हजार कोटी) खरेदी करणार. एटीसीचे भारतात 78 हजार टॉवर्स आहेत. या अधिग्रहण पश्चात ब्रुकफिल्डकडे भारतात 2 लाख 53 हजार टॉवर्सची मालकी येईल.
  • 2023 वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) भारतीय भांडवल बाजारात इक्विटी प्रकारात एकूण 1 लाख 70 हजार कोटींची खरेदी केली. यापैकी सुमारे 66134 कोटींची खरेदी एकट्या डिसेंबरमध्ये केली.
  • 29 डिसेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 2.759 अब्ज डॉलर्स वधारून 623.2 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. ( Economics news )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news