Stock market : वेध शेअर बाजाराचा; ‘हे’ ४ स्टॉक्स जोरदार ॲक्शनमध्ये | पुढारी

Stock market : वेध शेअर बाजाराचा; 'हे' ४ स्टॉक्स जोरदार ॲक्शनमध्ये

भरत साळोखे

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी निफ्टी 50 ने शेअर बाजाराला 21834.35 ह्या आतापर्यंतच्या ALL time high ची भेट दिली. या सप्ताहात निफ्टी आरामात 22000 ची महत्त्वाचा टप्पा पार करेल असे वाटत असतानाच पुढील दोन दिवसांत बाजार कोसळला आणि 1 टक्क्याहून अधिक घसरण बहुतेक निर्देशांकांमध्ये झाली. मात्र, पुढील दोन सत्रांमध्ये पुन्हा तेजी येऊन ही घसरण भरून निघाली. ( Stock market )

संबंधित बातम्या

सप्ताहाच्या अखेरीस निफ्टी 21700 च्या वर, सेन्सेक्स 72000 च्या वर तर बँकनिफ्टी 48000 च्या वर टिकून राहण्यात यशस्वी झाले. निफ्टीच्या मिडकॅप इंडेक्सने 47647.90 हा आजपर्यंतचा उच्चांक नोंदवला. निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉल कॅप ह्या दोन्ही निर्देशांकांनी सन 2023 मध्ये 50 टक्क्यांहून अधिक परतावा दिला. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समधील ही नेत्रदीपक तेजी म्युच्युअल फंडांमध्येही परावर्तीत झाली. निप्पॉन मिडकॅप फंडाने 51 टक्के तर महिंद्रा मनु लाईफ स्मॉल कॅप फंडाने 61 टक्के रिटर्नस् मागील एका वर्षात दिले.

सरासरी दैनंदिन व्हॉल्यूमच्या कितीतरी अधिक टे्रडेड व्हॉल्युममुळे खालील चार स्टॉकस्मध्ये जोरदार हालचाल दिसून आली.

1) indianbulls Real Estate – रु.97 व्हॉल्यूम 5 कोटी

2) Reliance Power – रु. 31.20 व्हॉल्यूम 88 कोटी

3)Vakrangee – रु. 21.40 व्हॉल्यूम 12 कोटी

4) Sobha- रु.1269 व्हॉल्यूम 1 कोटी

वरील शेअर्सपैकी डेलहर हा रिअल इस्टेटमधील शेअर आठवड्यात 27 टक्के वाढला तर Reliance Power आठवड्यात 32 टक्के वाढला. रिलायन्स पॉवरने अरुणाचल प्रदेशमधील आपला एक 1200 मेगावॅटच्या हायड्रो पॉवर प्रकल्प 128.39 कोटी रु. ना विकण्याच्या बातमीमुळे हा पेन्नी शेअर वरच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला आहे. मोतीलाल ओसवाल या आघाडीच्या ब्रोकरेज फर्मने सोभा ह्या कंपनीवर एक रिसर्च रिपोर्ट प्रसिद्ध केला आणि 2024 साठी सोभा हा आपला (Top Pick) असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पुढील दोन दिवसांत हा शेअर साडेसव्वीस टक्के वाढला. मोतीलाल ओसवालने या शेअरची टार्गेट प्राईस रु.1400 दिली असली तरी वर्षअखेरीस तो 2000 पर्यंत लीलया जाईल, असे वाटते. नेस्ले इंडिया ह्या जगद्विख्यात आहे.

खालील सहा Captial Foods शेअर्सनी गत सप्ताहात ५२ Week High चा उच्चांक नोंदवला. ५२ Week High हा बाजारातील ट्रेडर्ससाठी एक महत्त्वाचा इंडिकेटर मानला जातो.
1) – Bharat Electrnoics (Bel) – रु.187.55
2) Bharat Forge – रु.1265
3) GMR Airports infra- रु.84.94
4) Hindustan Aeronautics (HAL) -रु..2917
5) Kalpataru Projects- रु. 753
6) Sona BLW Precision- रु.670.20

हिंदुस्तान एरॉनॉटीक्सने (HAL) रु.2,00,000 कोटी बाजार भांडवल (Market Cap) चा टप्पा पार केला. हा शेअरही याच आठवड्यात रु. 3000 चा टप्पा पार करेल आणि मग रु. 5000 च्या दिशेने त्याचा प्रवास सुरू होईल.

Torrent power ने गुजरात सरकारबरोबर सोलार आणि हाइब्रीड पॉवर प्रोजेक्ट उभारण्यासाठी रु. 47350 कोटींचा करार केला आणि शेअरने 52 Week High चा उच्चांक नोदंवला (रु.1059).

मॉर्गन स्टॅन्लेने भारतातील गॅस सेक्टर शेअर्ससाठी अधिक वाढीच्या संधी आहेत, असा अभिप्राय नोंदवून ONGC-Gail, oil india, gujarat Gas

ह्या शेअर्सच्या Target Price मध्ये वाढ केली आहे. देशातील गॅस पाईपलाईनचे जाळे दुप्पट झाले आहे आणि त्यामुळे वरील कंपन्यांच्या व्हॉल्यूममध्ये वाढ होईल, असे मॉर्गन स्टॅन्लेचे मत आहे. ( Stock market )

सन 2023 या सरलेल्या वर्षाने भारतीय शेअर बाजारला काय दिले? सर्वांत मुख्य म्हणजे 22 टक्के रिटर्नस दिले. भारताचा ( market cap to GDP) रेशो वाढला. भारताचे एकूण (market Capitalisation) (बाजार भांडवल) ने (4 Trillion Dollars) चा टप्पा पार केला. 1 Trillion Dollars = 1 लाख कोटी आता भारताचे शेअर मार्केट अमेरिका, चीन, आणि जपानच्या खालोखाल चौथ्या क्रमांकावर आहे.

सन 2024 मध्ये शेअर मार्केटची स्थिती काय असेल ? निश्चित तेजीच्या वाटेवरची असेल. Strong Domestic inflow आणि Encouraging Economic Data ही दोन प्रमुख कारणे असतील. जगभराचे व्याज दर कमी होण्यास सुरुवात होईल. अमेरिकेतील जगभराचे व्याज दर कमी झाले की भारतातील Debt market मध्ये परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढेल. त्यामुळे भारतीय रूपया स्थिर राहील आणि ( Low cost funding) मुळे कंपन्यांच्या (Earnings) मध्ये वाढ होईल. एकूणच 2024 हे वर्ष भारतीय शेअर बाजारसाठी संस्मरणीय ठरेल. ( Stock market )

Back to top button