Stock Market Closing ‍‍Bell | बाजारात जोरदार नफावसुली! सेन्सेक्स ७२ हजारांच्या खाली, ‘या’ स्टॉक्समुळे दबाव | पुढारी

Stock Market Closing ‍‍Bell | बाजारात जोरदार नफावसुली! सेन्सेक्स ७२ हजारांच्या खाली, 'या' स्टॉक्समुळे दबाव

पुढारी ऑनलाईन : आज मंगळवारी शेअर बाजारात जोरदार नफावसुली दिसून आली. यामुळे आज सेन्सेक्स आणि निफ्टी गडगडले. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स सुमारे ६५० अंकांनी घसरून ७१,८०० च्या खाली आला. तर निफ्टी २१ हजारांच्या पातळीवर राहिला. त्यानंतर सेन्सेक्स ३७९ अंकांच्या घसरणीसह ७१,८९२ वर बंद झाला. तर निफ्टी ७६ अंकांनी घसरून २१,६६५ वर स्थिरावला. निफ्टी बँक, निफ्टी फायनान्सियस सर्व्हिसेसही आज लाल चिन्हात गेले. (Stock Market Closing ‍‍Bell)

क्षेत्रीय पातळीवर फार्मा निर्देशांक २.५ टक्क्यांनी वाढला, तर ऑटो, बँक आणि आयटी प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले.

आशियाई बाजारातील कमकुवत संकेतांच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स आज ७२,३३२ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७१,६१३ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर एम अँड एम, अल्ट्राटेक, कोटक बँक, एलटी, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, विप्रो, टेक महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस, एनटीपीसी हे शेअर्स सर्वाधिक घसरले. तर सन फार्मा, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स, भारती एअरटेल हे शेअर्स वाढले.

sensex closing

निफ्टीवर आयशर मोटर्स, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट, एलटी आणि कोटक बँक हे टॉप लूजर्स होते. तर डिव्हिज लॅब, अदानी पोर्ट्स, सन फार्मा, कोल इंडिया, सिप्ला हे शेअर्स टॉप गेनर्स होते.

झोमॅटोचे शेअर्स वधारले, काय कारण?

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे (Zomato) शेअर्स बीएसई (BSE) वर मंगळवारच्या सत्रात २ टक्क्यांहून अधिक वाढून १२८ रुपयांवर पोहोचले. झोमॅटोने ग्राहकांना फूड डिलिव्हरीसाठी प्लॅटफॉर्म फी ३ रुपयांवरून ४ रुपये प्रति ऑर्डर केली आहे. या पार्श्वभूमीवर झोमॅटोचे शेअर्स वधारले आहेत. (Zomato Share Price)

व्होडाफोन आयडिया शेअर्सला फटका

शेअर बाजारात जोरदार नफावसुली राहिली. याच दरम्यान व्होडाफोन आयडियाचे शेअर्स (Vodafone Idea Share Price) आज ५ टक्क्यांहून अधिक घसरून १६ रुपयांवर आले. या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक घसरण होण्याचे कारण कंपनीने जारी केलेले निवेदन असल्याचे समजते. दूरसंचार सेवा प्रदाता व्होडाफोन आयडियाने २ जानेवारी रोजी भारतातील सेवा व्यवस्थापित करण्यासाठी एलन मस्क प्रमोटेड सॅटेलाईट इंटरनेट युनिट स्टारलिंकशी चर्चा केली नसल्याचे म्हटले आहे. कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, “कंपनीने अशा कोणत्याही पक्षाशी चर्चा केलेली नाही.” (Stock Market Closing ‍‍Bell)

‘हे’ घटक कारणीभूत

नफावसुली

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, नफावसुली एका उंचीवर गेल्यानंतर बाजारात अचानक घसरण दिसून येत आहे. काल सोमवारच्या सत्रात निफ्टी २१,८३४ च्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. पण कालच्या ट्रेडिंग सत्राच्या शेवटच्या ३० मिनिटांत विक्री झाली. यावरून हे सूचित होते की नफावसुलीमुळे बाजार असुरक्षित होऊ शकतो.

जागतिक बाजार

MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा व्यापक निर्देशांक ०.६ टक्क्यांनी घसरला. जपानमधील शेअर बाजार सुट्टीमुळे बंद राहिला. तर हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक १.८५ टक्क्यांनी घसरला.

हे ही वाचा :

 

Back to top button