पुढारी ऑनलाईन डेस्क : दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज गुरुवारी (दि.४) शेअर बाजारात तेजी परतली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४५० अंकांनी वाढून ७१,८०० वर गेला. तर निफ्टी ८६ अंकांच्या वाढीसह २१,६०० पार झाला. आजच्या बाजारातील तेजीत बँकिंग, वित्तीय आणि आयटी शेअर्स आघाडीवर आहेत.
अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह नेमकी कधी व्याजदरात कपात करणार? याबद्दल गुंतवणूकदार साशंक आहेत. यामुळे जागतिक संकेत नकारात्मक असतानाही भारतीय शेअर बाजाराने तेजीत सुरुवात केली आहे.
सेन्सेक्स आज ७१,६७८ वर खुला झाला. त्यानंतर तो ७१,७५० पार झाला. सेन्सेक्सवर एनटीपीसी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक, पॉवर ग्रिड, इन्फोसिस हे शेअर्स टॉप गेनर्स होते. तर टीसीएस, मारुती, एचसीएल टेक हे शेअर्स किरकोळ घसरले आहेत.
निफ्टी ५० वर बजाज फायनान्स, एनटीपीसी, टाटा कन्झ्युमर, बजाज फिनसर्व्ह, ओएनजीसी हे शेअर्स सर्वाधिक वाढले आहेत. तर बीपीसीएल, बजाज ऑटो, LTIMINDTREE, मारुती, टाटा स्टील हे शेअर्स घसरले आहेत.
हे ही वाचा :