Closing Bell | जोरदार खरेदीमुळे तेजी परतली! सेन्सेक्स ४९० अंकांनी वाढला, निफ्टी २१,६५० पार | पुढारी

Closing Bell | जोरदार खरेदीमुळे तेजी परतली! सेन्सेक्स ४९० अंकांनी वाढला, निफ्टी २१,६५० पार

पुढारी ऑनलाईन : सलग दोन दिवसांच्या नफावसुलीनंतर आज सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजी पकडली. जागतिक संकेत संमिश्र असतानाही भारतीय बाजारात आज खरेदीचा जोर दिसून आला. सेन्सेक्स ४९० अंकांनी वाढून ७१,८४७ वर बंद झाला. तर निफ्टी १४१ अंकांच्या वाढीसह २१,६५८ वर स्थिरावला. क्षेत्रीय आघाडीवर रियल्टी निर्देशांक ६ टक्के, पॉवर २ टक्के, बँक, कॅपिटल गुड्स, हेल्थ केअर आणि ऑईल आणि गॅस प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले.

सेन्सेक्स टॉप गेनर्स

बजाज फायनान्स (४.४४ टक्के वाढ)- ७,७०९ रुपये
एनटीपीसी (३.५४ टक्के वाढ)- ३१७ रुपये
इंडसइंड बँक (२.८८ टक्के वाढ)- १,६४७ रुपये
ॲक्सिस बँक (२.२७ टक्के वाढ)- १,१२४ रुपये
टाटा मोटर्स (१.८३ टक्के वाढ)- ७९५ रुपये
नेस्ले इंडिया (१.७९ टक्के)- २७,११६ रुपये

सेन्सेक्स टॉप लूजर्स

एचसीएल टेक (१.२४ टक्के घसरण)- १,४१९ रुपये
एम अँड एम (०.८५ टक्के घसरण)- १,६४१ रुपये

एनएसई निफ्टी ५० वर बजाज फायनान्स, टाटा कन्झ्युमर, एनटीपीसी, ओएनजीसी, इंडसइंड बँक हे सर्वाधिक वाढले. डॉ. रेड्डीज, बीपीसीएल, LTIMINDTREE, एचसीएल टेक, हिरो मोटोकॉर्प हे घसरले.

अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह नेमकी कधी व्याजदरात कपात करणार? याबद्दल गुंतवणूकदार साशंक आहेत. यामुळे जागतिक संकेत संमिश्र असतानाही भारतीय शेअर बाजाराने तेजीत व्यवहार केला.

या शेअर्सची रॉकेट भरारी

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने २०२४ या वर्षासाठी शोभा स्टॉक त्याच्या टॉप निवडींपैकी एक असल्याचे सांगितल्यानंतर शोभा कंपनीचे शेअर्स आजच्या व्यवहारात एनएसईवर सुमारे १९ टक्क्यांनी वाढले. दरम्यान दुपारच्या व्यवहारात हा शेअर्स १६ टक्के वाढीसह १,३०७ रुपयांवर होता. (Sobha Share Price)

डिसेंबरमध्ये FPI कडून विक्रमी खरेदी

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार, परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) डिसेंबरमध्ये एकूण ६६१.३५ अब्ज रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली. ही विक्रमी मासिक खरेदी आहे. या विक्रमी खरेदीने सेन्सेक्स आणि निफ्टी ५० ला सर्वकालिक उच्चांकापर्यंत नेले.

हे ही वाचा :

 

 

Back to top button