Stock Market Updates | सेन्सेक्स सपाट, निफ्टी २१,३५० वर, IT वर विक्रीचा दबाव | पुढारी

Stock Market Updates | सेन्सेक्स सपाट, निफ्टी २१,३५० वर, IT वर विक्रीचा दबाव

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात आज मंगळवारी सुस्त स्थिती दिसून येत आहे. ख्रिसमसच्या सुट्टीनंतर जगभरातील बाजारात सपाट व्यवहार दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आज सपाट पातळीवर खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५० अंकांनी वाढून ७१,१६० वर होता. तर निफ्टी ३२ अंकांनी २१,३८२ वर व्यवहार करत आहे. आज सुरुवातीच्या व्यवहारात आयटी क्षेत्रातील शेअर्स विक्रीमुळे बाजारावर दबाव दिसून येत आहे. (Stock Market Updates)

संबंधित बातम्या 

सेन्सेक्सवर टाटा स्टील, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम, एसबीआय, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स वाढले आहेत. तर इन्फोसिसचा शेअर्स १.६६ टक्क्यांनी घसरून १,५३६ रुपयांवर आला आहे. त्यासोबतच विप्रो, एचसीएल टेक, टीसीएस, टेक महिंद्रा या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

निफ्टी आज २१,३६५ वर खुला झाला. निफ्टीवर हिरो मोटोकॉर्प, यूपीएल, टाटा कन्झूमर, एनटीपीसी, टाटा स्टील हे शेअर्स सर्वाधिक वाढले आहेत. तर इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, टीसीएस हे आयटी शेअर्स घसरले आहेत.

Back to top button