Stock Market Updates | शेअर बाजाराची सावध सुरुवात, सेन्सेक्स ७१,५०० वर

Stock Market Updates | शेअर बाजाराची सावध सुरुवात, सेन्सेक्स ७१,५०० वर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : रेकॉर्डब्रेक तेजीनंतर आज सोमवारी (दि. १८) आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात सावध झाली होती. सेन्सेक्स आज सकाळच्या व्यवहारात किरकोळ वाढीसह ७१,५०० वर व्यवहार करत होता. तर निफ्टी २१,४६० वर होता. (Stock Market Updates)

संबंधित बातम्या

सेन्सेक्सवर आयटीसी, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स घसरले आहेत. तर सन फार्मा, नेस्ले इंडिया, विप्रो, भारती एअरटेल हे शेअर्स वाढले आहेत.

आशियाई बाजारात कमकुवत स्थिती

आज सोमवारी आशियाई बाजारात संथ सुरुवातीनंतर घसरण दिसून येत आहे. बँक ऑफ जपान (BOJ) ची आजपासून दोन दिवसीय पतविषयक धोरण बैठक सुरू झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे जपानच्या मध्यवर्ती बँकेच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या या सावध भूमिकेचे आशियाई बाजारात पडसाद दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.६६ टक्के म्हणजेच २१७.४६ अंकांनी घसरून ३२,७५३.०९ वर आला. तर व्यापक टॉपिक्स निर्देशांक ०.८६ टक्के म्हणजेच २०.०६ अंकांनी घसरून २,३१२.२२ वर आला. (Stock Market Updates)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news