शेअर बाजारात तेजीचा ‘झंझावात’! सेन्सेक्स सार्वकालीन उच्चांकावर, निफ्टीने प्रथमच ओलांडला 21,100 चा टप्पा

शेअर बाजारात तेजीचा ‘झंझावात’! सेन्सेक्स सार्वकालीन उच्चांकावर, निफ्टीने प्रथमच ओलांडला 21,100 चा टप्पा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  भारतीय शेअर बाजारात आज ( दि.१४ )व्‍यवहाराची सुरुवात होताच गुंतवणुकदारांनी तेजीचा झंझावत अनुभवला. प्रमुख निर्देशांक सार्वकालीन उच्चांकावर उघडले आणि नवीन विक्रम प्रस्थापित केले. बीएसई सेन्सेक्सने 70,200 तर निफ्टीने 21120 ची पातळी ओलांडली. बुधवारी ( दि. १३ डिसेंबर) सेन्सेक्स 33 अंकांनी वाढून 69,584 वर स्‍थिरावला होता.

बाजारात चाैफेर खरेदी

आज बाजारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांच्या नेतृत्वाखालील वाढीसह व्यापक निर्देशांक सकारात्मक क्षेत्रात उघडले. बाजारातील चौफेर खरेदीत बँकिंग आणि आयटी समभाग आघाडीवर आहेत. HCL Technologies, Tech Mahindra, LTI Mindtree, Infosys आणि Wipro हे निफ्टी 50 निर्देशांकात सर्वाधिक वाढले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 1.38% ने वाढून रु. 2,467.20 वर पोहोचली आहे. मूडीजने रिलायन्सचे रेटिंग Baa2 वर स्थिर दृष्टीकोनसह पुष्टी केली आहे.

Share Market Opening Bell : निफ्टीने प्रथमच पार केला 21,150 चा टप्पा

बाजारात तेजीचा कल कायम आजही कायम राहिला आहे. आयटी निर्देशांक 8 महिन्यांच्या उच्चांकावर व्यवहार करत आहे. 5 महिन्यांत आयटी निर्देशांकात इंट्रा-डे मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, निफ्टीने प्रथमच 21,150 चा टप्पा ओलांडला आहे. सेन्सेक्सने प्रथमच 70,400 चा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टी बँक प्रथमच 47,800 च्या पुढे व्यवहार करत आहे.

अमेरिकेसह आशियाई बाजारातूनही सकारात्‍मक संकेत

अमेरिकेतून बाजारासाठी चांगली बातमी येत आहे. FED ने व्याजदरात कोणताही बदल केला नाही. 2024 मध्ये तीन वेळा दर कमी करण्याचे संकेत आहेत. पुढील वर्षी दर दीड टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात. 10 वर्षांचे रोखे उत्पन्न 4 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. दरम्यान, फेडच्या या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. अमेरिकेच्‍या शेअर बाजारानेही तेजी अनुभवली. तसेच  ज आशियाई बाजारांमध्ये व्यापार तेजीत आहे. GIFT NIFTY 200.00 अंकांनी वधारला आहे. तैवानचा बाजार 0.99 टक्क्यांनी वाढून 17,642.62 वर व्यवहार करत आहे. तर हँग सेंग 0.80 टक्क्यांनी वाढून 16,363.64 च्या पातळीवर दिसत आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news