अर्थभान : कमी मूल्याच्या नोटा वाढल्याने व्यवहारांत वाढ | पुढारी

अर्थभान : कमी मूल्याच्या नोटा वाढल्याने व्यवहारांत वाढ

मुंबई : कमी दर्शनी मूल्याच्या नोटांची मागणी वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे प्रमाण वाढले आहे. चलनातील रोखीचे प्रमाण वाढल्याचा अर्थ बेहिशेबी पैसा वाढला  असा होत नाही, असा निष्कर्ष स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात काढण्यात आला आहे. मोठ्या रकमेच्या नोटा नसल्यामुळे छोट्या नोटांची मागणी वाढली आहे. याचा परिणाम म्हणून रक्‍कम तेवढीच असली तरी आर्थिक व्यवहारांत वाढ झाली आहे. 2 हजारांच्या नोटांचे प्रमाण अपुरे आहे. 2 हजारांच्या नोटांची छपाईही सरकारने बंद केल्याचे मानले जात आहे. त्यामुळे लहान मूल्याच्या नोटांना महत्त्व आले आहे, असे ‘एसबीआय’चे मुख्य अर्थतज्ज्ञ सौम्यकांती घोष यांनी सांगितले. 

Back to top button