Tata Altroz : जाणून घेऊया टाटाच्या नव्या हॅचबॅक कार बद्दल… | पुढारी

Tata Altroz : जाणून घेऊया टाटाच्या नव्या हॅचबॅक कार बद्दल...

पुढारी ऑनलाईन डेस्क: टाटा मोटर्स आता हॅचबॅकमध्ये Tata Altroz चे नवे व्हर्जन घेऊन येत आहे. याची चाचणीही सुरु झाली असून लवकरच ही गाडी ग्राहकांच्या सेवेत हजर होणार आहे. मारुतीच्या बलेनोला टक्कर देण्यासाठी टाटाने हे नवे मॉडेल बाजारात आणणार आहे.

२०२३ च्या सुरुवातीला Tata Altroz  कारचे नवे व्हर्जन बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात असून,यामध्ये CNG मॉडेल किंवा इलेकट्रीक मॉडेल असणार की नाही याबद्दल कंपनीकडून काही सांगण्यात आलेले नाही. या कारमध्ये मोनोटोन अलॉयव्हील, डिफॉगर असून कार १८ ते २३ मायलेज देऊ शकेल.

 यापूर्वी  Tata Altrozचे इलेक्ट्रिक व्‍हर्जन आले हाेते बाजारात 

Tata Altroz EV ही टाटाची हॅचबॅक इलेक्ट्रिक कार असून, यामध्ये क्लोज्ड ऑफ ग्रिल्स, स्टार पॅटर्न-फ्रंट एअर डॅम, नवीन डिझायनचे अलॉय व्हील, ब्लॅक-आऊट टेलगेट आणि रोटरी गियर सेलेक्टर अशा सुविधा आहेत.

हे वाचलंत का?

Back to top button