Ratan Tata : उद्योगपती रतन टाटा ठरले सर्वात चाहते व्यक्ती; ‘वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३’ मध्ये मिळाले पहिले स्थान | पुढारी

Ratan Tata : उद्योगपती रतन टाटा ठरले सर्वात चाहते व्यक्ती; 'वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३' मध्ये मिळाले पहिले स्थान

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hurun India Rich List 2023 नुसार, उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांना भारतीय सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केले जाणारे उद्योजक होण्याचा मान मिळाला आहे. त्यांचे एक्स या सोशल मीडया अकाऊंटवर 12.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. मिन्ट या इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील सर्वात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या व्यक्तींमध्ये उद्योगपती रतन टाटा यांना पहिले स्थान तर उद्योगपती आनंद महिंद्रा यांना दुसरे स्थान प्राप्त झाले आहे.

Hurun India आणि 360 ONE Wealth यांच्या संयुक्तपणे 360 ONE Wealth Hurun India Rich List 2023 असा अहवाल प्रदर्शित केला जातो. या अहवालात भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींचे 12 वे वार्षिक संकलन केले जाते. रतन टाटा यांना 360 वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 मध्ये इतर सर्व लोकांपैकी सर्वात जास्त फॉलोअर्स असलेली व्यक्ती म्हणून सन्मान मिळाला आहे. त्यांच्या एक्स या सोशल मीडिया अकाऊंटच्या फॉलोअर्समध्ये एका वर्षात 800,000 ची लक्षणीय वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या

या अहवालानुसार, आनंद महिंद्रा यांचे 10.8 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर मुकेश अंबानी यांनी गौतम अदानींना मागे टाकत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपले स्थान पुन्हा मिळवले आहे. या कालावधीत अंबानींच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे, ती जवळपास 8,08,700 कोटींवर पोहोचली आहे. तसेच या यादीत शिव नाडर 2,28,900 कोटींच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत, त्यानंतर गोपीचंद हिंदुजा आणि त्यांचे कुटुंब 1,76,500 कोटींच्या संपत्तीसह आहे. दिलीप सांघवी ₹1,64,300 कोटींच्या संपत्तीसह सहाव्या स्थानावर आहेत.

हेही वाचा

Back to top button