आता भारताची ‘पेमेंट सिस्टम’ फ्रान्समध्येही, UPI वापरणारा पहिला युरोपियन देश

UPI
UPI
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील पेमेंट सिस्टम असलेली युपीआय (UPI-Unified Payments Interface) आता फ्रान्समध्ये वापरली जाणार आहे. भारत आणि फ्रान्सने त्यांच्या युपीआय पेमेंट सिस्टमसाठी आयफेल टॉवर लाँचपॅड म्हणून निवडले आहे.  प्रसिद्ध अशा आयफेल टॉवरपासून युपीआय सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. फ्रान्स हा युपीआय वापरणारा पहिला युरोपियन देश बनणार. (UPI)

व्यापार आणि पर्यटनाच्‍या प्रगतीसाठी ठरणार पुरक

फ्रान्समधील 'युपीआय'चे एकत्रीकरण भारतीय व्यक्तींना त्यांच्या खर्चाच्या सवयी सुलभ करण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देते. या सेवेमुळे अवजड फॉरेक्स कार्डची गरज आणि रोख रक्कम घेऊन जाण्याचा त्रास दूर केला जाऊ शकतो. भारत आणि फ्रान्समधील ही द्विपक्षीय घोषणा दोन्ही देशातील व्यापार आणि पर्यटनासाठी लक्षणीय प्रगतीसाठी पुरक ठरणार आहे.

युपीआय अनेक बँक खाती एकाच मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये एकत्रित करते. अखंड फंड रूटिंग, व्यापारी पेमेंट आणि विविध बँकिंग वैशिष्ट्ये सक्षम करते. याव्यतिरिक्त, हे "पीअर टू पीअर" रिक्वेस्टची देखील पूर्तता करते, ज्या वैयक्तिक आवश्यकता आणि सोयीनुसार शेड्यूल केल्या जाऊ शकतात आणि पैसे देऊ शकतात.

UPI : युपीआय  वापरामध्ये  वाढ

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NCPI)  एप्रिल २०१६ मध्ये २१ सदस्य बँकांसह एक प्रायोगिक प्रक्षेपण आयोजित केले होते. तेव्हापासून युपीआय  वापरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. २०२२ मध्ये, NPCI ने फ्रान्सच्या Lyra नावाच्या जलद आणि सुरक्षित ऑनलाइन पेमेंट सिस्टमसह एक सामंजस्य करार केला. या वर्षी,  युपीआय आणि सिंगापूरच्या PayNow ने एका करारावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे दोन्ही देशातील वापरकर्त्यांना सीमापार व्यवहार करता येतील.

युपीआयची सिंगापूर, UAE, ओमान, सौदी अरेबिया, मलेशिया, फ्रान्स, BENELUX मार्केट (बेल्जियम, नेदरलँड्स आणि लक्झेंबर्ग) आणि स्वित्झर्लंडसह अनेक देशांमध्येही युपीआय सेवा आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news