Stock Market Closing | सेन्सेक्स ३११ अंकांनी वाढून ६०,१५७ वर बंद, बँकिंग स्टॉक्सची दमदार कामगिरी, 'रियल्टी'वर विक्रीचा दबाव | पुढारी

Stock Market Closing | सेन्सेक्स ३११ अंकांनी वाढून ६०,१५७ वर बंद, बँकिंग स्टॉक्सची दमदार कामगिरी, 'रियल्टी'वर विक्रीचा दबाव

पुढारी ऑनलाईन : जागतिक मजबूत संकेत आणि मार्च तिमाहीतील कॉर्पोरेट कंपन्यांच्या कमाईच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी भारतीय शेअर बाजारात तेजी राहिली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३९९ अंकांनी वाढून ६०,२४६ वर पोहोचला होता. तर निफ्टी ११३ अंकांच्या वाढीसह १७,७३७ वर होता. त्यानंतर सेन्सेक्स ३११ अंकांनी वाढून ६०,१५७ वर बंद झाला. तर निफ्टी ९८ अंकांच्या वाढीसह १७,७२२ वर स्थिरावला. सेन्सेक्सची सलग सातव्या सत्रांत तेजी कायम राहिली आहे. आजच्या व्यवहारात बँकिंग आणि मेटल स्टॉक्स आघाडीवर राहिले. तर आज रियल्टी स्टॉक्सना विक्रीच्या दबावाचा सामना करावा लागला. ऑईल आणि गॅस स्टॉक्सही वाढले. यात अदानी टोटल गॅसचा शेअर ५ टक्क्यांनी वाढला. १,९८९ शेअर्स वाढले. तर १,३११ शेअर्स घसरले आणि ८३ शेअर्स कोणताही बदल दिसून आला नाही. (Stock Market Closing)

IT मध्ये घसरण, बँकिंग स्टॉक्स वधारले

आजच्या व्यवहारात IT स्टॉक्स सुमारे १ टक्क्याने घसरले तर बँकिंग स्टॉक्स १ टक्क्यांहून अदिक वाढल्याचे दिसून आले. इन्फोसिस, एल अँड टी, टाटा कन्सल्टंसी, Persistent Systems, Coforge, एचसीएल टेक्नॉलॉजीस, विप्रो हे शेअर्स घसरले होते. तर बँकिंगमध्ये कोटक महिंद्रा, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, युको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया हे शेअर्स वाढले. या शेअर्सनी १ ते ३ टक्के वाढून व्यवहार केला. कोटक महिंद्राचा शेअर्स ५ टक्क्यांनी वाढला. बँक ऑफ बडोदाचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास ४ टक्के वाढले. कारण मार्च २०२३ ला संपलेल्या तिमाहीत बँक ऑफ बडोदाच्या उलाढालीत वाढ झाली आहे.

‘हे’ होते टॉप गेनर्स, टॉप लूजर्स

सेन्सेक्सवर कोटक महिंद्रा बँक, आयटीसी, आयसीआयसीआय, मारुती सुझुकी, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम हे टॉप गेनर्स होते. हे शेअर्स सुमारे १ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढले. टाटा मोटर्स, विप्रो, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि टीसीएस, इन्फोसिस हे घसरले. निफ्टीवर कोटक महिंद्रा, जेएसडब्ल्यू, आयशर मोटर्स, बजाज ऑटो, आयटीसी हे शेअर्स वाढले होते. (Stock Market Closing)

आशिया, युरोपीय बाजारात तेजी

मध्यवर्ती बँका व्याजदर वाढीचे चक्र थांबवतील या आशेने गुंतवणुकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. यामुळे आशियाई बाजारात तेजी होती. जपानचा निक्केई २२५ निर्देशांकांना १ टक्के वाढून व्यवहार केला. हाँगकाँगचा हँग सेंगही वाढला. युरोपीय बाजारातही तेजीचे वातावरण होते.

हे ही वाचा :

Back to top button