आठवड्याची सुरुवात सकारात्‍मक, शेअर बाजारातील घसरण थांबली; सेन्‍सेक्‍ससह नेफ्‍टीतही तेजी | पुढारी

आठवड्याची सुरुवात सकारात्‍मक, शेअर बाजारातील घसरण थांबली; सेन्‍सेक्‍ससह नेफ्‍टीतही तेजी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मागील  काही दिवस सुरु असलेल्‍या शेअर बाजारातील चढ-उताराला आज आठवड्याच्‍या सुरुवातीला ब्रेक बसला. सोमवारी व्‍यवहाराची सुरुवात झाल्‍यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्‍ही मुख्‍य निर्देशाकांनी तेजी अनुभवली.

आज ( दि. १३ ) शेअर बाजाराची सुरुवात सकारात्‍मक झाल्‍याचे दिसले. बाजार सुरु होताच सेन्सेक्स १४३ अकांनी वधारत ५९२७८ वर व्‍यवहार सुरु झाले. तर निप्‍टी निर्देशांन ७० अंकांनी वाढला तो १७४८३ वर व्‍यवहार करत आहे. जागतिक बाजारापेठेतील नकारात्‍मक सूरामुळे शुक्रवारी ( दि. १० मार्च ) गुंतवणूकदारांना २.६७ लाख कोटी रुपयांना फटका बसला होता. १० मार्च रोजी शेअर बाजारातील व्‍यवहार बंद होताना सेन्‍सेक्‍स निर्देशांक ५९,०८७वर आला होता.

दुपारनंतर शेअर बाजार कोसळला

शेअर बाजाराची सुरुवात सकारात्‍मक झाली तरी दुपारी दोनच्‍या सुमारास सेक्‍सेस ७२९.७४ अंकांनी कोसळत ५८,४०५ वर व्‍यवहार करताना दिसला. निप्‍टीतही २०० अंकांनी घसरण होत १७,२१२ वर व्‍यवहार करत होता. निफ्टीच्या 50 पैकी 40 समभाग घसरले तर सेन्सेक्समधील 30 पैकी 26 शेअर घसरले. त्याचवेळी निफ्टी बँकेच्या 12 पैकी 11 समभागात घसरण झाली.

अदानी ग्रुप, टेक महिंद्राचे शेअर वधारले

आजच्‍या व्‍यवहरात अदानी ग्रुपचे शेअर वधारले. अदानी ग्रीन, अदानी पॉवर, अदानी टोटल, अदानी ट्रान्समिशनने तेजी अनुभवली.अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटलच्या समभागांवर अतिरिक्त दीर्घकालीन लक्ष ठेवण्यात आले आहे. शेअर बाजाराच्या परिपत्रकानुसार हे पाऊल आजपासून लागू झाले आहे.अदानी एंटरप्रायझेस एक टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले.टेक महिंद्रा कंपनीच्‍या शेअर्सनी तेजी अनुभवली. कंपनीने मोहित जोशी यांची नवीन सीईओ म्‍हणून नियुक्‍तीची घोषणा केली होती. यानंतर आज बाजारातील सुरुवातीच्‍या व्‍यवहारात टेक महिंद्राच्‍या समभागांची जोरदार विक्री झाली.

Ambuja Cements  शेअरमध्‍ये १.३६ टक्‍के घसरण

आज Ambuja Cements  शेअरमध्‍ये १.३६ टक्‍के घसरण झाली. अंबुजा सिमेंट कंपनी खरेदी करण्‍यासाठी अदानी ग्रुपने घेतलेले कर्जाच्‍या रक्‍कमेपैकी ५० कोटी डॉलर (४०९७ कोटी रुपये ) अदा करण्‍यात आली आहे. तरीही आज अंबुजा सिमेंटच्‍या शेअर विक्रीकडे कल राहिल्‍याचे दिसले.

हेही वाचा :

 

 

 

Back to top button