तब्‍बल एकोणीस महिन्यांचे परिश्रम आणि सर्वोत्‍कृष्‍ट गाण्याची निर्मिती, जाणून घ्‍या 'नाटू नाटू' गाण्याचा रंजक प्रवास | पुढारी

तब्‍बल एकोणीस महिन्यांचे परिश्रम आणि सर्वोत्‍कृष्‍ट गाण्याची निर्मिती, जाणून घ्‍या 'नाटू नाटू' गाण्याचा रंजक प्रवास

पुढारी ऑनलाईन : यंदाच्या ऑस्‍कर सोहळ्यात भारतीय चित्रपट ‘RRR’ ने आपल्‍या यशाची मोहर उमटवली. ‘आर आर आर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्‍ट ओरिजनल गाण्याचा पुरस्‍कार मिळाला. यामुळे भारतीय प्रेक्षकांची सकाळची सुरूवात या सुखद बातमीने झाली असे म्‍हणावे लागेल. ‘RRR’ चित्रपटाने याआधीच भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता ऑस्‍कर मिळवून या चित्रपटाने एक इतिहास रचला आहे. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यातील डान्सच्या स्‍टेप्सने चित्रपट सरिकांची मने जिंकली होती. त्‍यामुळे या गाण्याची जगभर चर्चा झाली होती. या गाण्याच्या निर्मिती विषयी जाणून घेवूयात रंजक गोष्‍टी…

सध्या जगभरात ‘आरआरआर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याची जोरदार चर्चा आहे. या गाण्याला ओरिजिनल साँग मोशन पिक्चर श्रेणीतील पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. या गाण्याला सुरावट एम. एम. किरवणी यांनी दिली असून, चंद्रबोस यांनी त्याचे लेखन केले आहे.

चंद्रबोस यांनी 17 जानेवारी 2020 पासून या गाण्याची निर्मिती करायला सुरुवात केली. गाण्याचे 90 टक्के काम दोन दिवसांत पूर्ण झाले. तथापि, नंतर शब्दांचा खेळ सुरू झाला आणि त्यामुळे संपूर्ण गाणे तयार होण्यासाठी 19 महिने लागले. या गाण्याचे शूटिंग युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर करण्यात आले आहे. याबद्दल दिग्दर्शक राजामौली यांनी एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली होती. तसेच ‘आरआरआर’ चित्रपटाच्या इन्स्टाग्राम पेजवरून देखील युक्रेनमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले होते.


हेही वाचा :  

Back to top button