Stock Market Opening | तेजीनंतर शेअर बाजार पुन्हा अस्थिर, आज कोणते शेअर्स करतील परफॉर्म? | पुढारी

Stock Market Opening | तेजीनंतर शेअर बाजार पुन्हा अस्थिर, आज कोणते शेअर्स करतील परफॉर्म?

Stock Market Opening : शेअर बाजारातील तेजी बुधवारी टिकून राहिली नाही. आज बुधवारी (दि.१५) सेन्सेक्स सुमारे २५० अंकांनी घसरून ६१ हजारांच्या खाली आला. तर निफ्टी १७,८०० वर व्यवहार करत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात व्होडाफोन आयडिया, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज हे शेअर्स वधारले होते. तसेच एचसीएल टेक, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, मारुती ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा हेदेखील हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. तर आयटीसी, हिंदूस्तान युनिलिव्हर, टीसीएस, लार्सन अँड टुब्रो आणि सन फार्मा हे शेअर्स टॉप लूजर्स होते. १३ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांपैकी ११ निर्देशांक घसरले आहेत. दरम्यान, सकाळी १० च्या सुमारास सेन्सेक्सने सावरत स्थिर पातळीच्या दिशेने चाल केली.

NSE वर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी (दि. १४) परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) १,३०५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) २०४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतील महागाई दर आहे तसाच राहणार असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामुळे दीर्घकाळपर्यंत उच्च व्याजदर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली.

दरम्यान, मंगळवारी अमेरिकेतील शेअर बाजारात संमिश्र वातावरण राहिले. तर आशियाई बाजारात घसरण झाली आहे. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक १.४३ टक्के घसरला. (Stock Market Opening)

 हे ही वाचा :

Back to top button