Stock Market Closing | सेन्सेक्स, निफ्टी लाल रंगात बंद, बँकिंग स्टॉक्सना मोठा फटका, वाचा आज काय घडलं बाजारात? | पुढारी

Stock Market Closing | सेन्सेक्स, निफ्टी लाल रंगात बंद, बँकिंग स्टॉक्सना मोठा फटका, वाचा आज काय घडलं बाजारात?

Stock Market Closing : भारत आणिे अमेरिकेतील जाहीर होणारा महागाई दर तसेच अदानी समूहाच्या वाढलेल्या अडचणी आदींमुळे शेअर बाजारात आज सोमवारी (दि.१३) घसरण झाली. सकाळी १०.१५ च्या सुमारास सेन्सेक्स ३८७ अंकांनी घसरून ६०, २९५ वर आला. तर निफ्टीने १०९ अंकांच्या घसरणीसह १७,७४७ वर व्यवहार केला. तर दुपारी १२.२० वाजता सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली आला होता. त्यानंतर सेन्सेक्स २५० अंकांच्या घसरणीसह ६०,४३१ वर बंद झाला. तर निफ्टी ८५ अंकांनी खाली येऊन १७,७७० वर स्थिरावला.

आजच्या व्यवहारात बँकिंग स्टॉक्सना मोठा फटका बसला. NSE वर सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज लाल रंगात बंद झाले. आयटी शेअर्समध्येही घसरण दिसून आली. १३ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांपैकी १० मध्ये घसरण झाली. अमेरिकेतील अर्थव्यवस्था संथगतीने मार्गक्रमण करत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयटी शेअर्स सुमारे २ टक्क्याने खाली आले.

आयटी शेअर्संना फटका

आयटीमध्ये कोफोर्ज (-६.१५ टक्के), पर्सिस्टंट सिस्टम्स लि. (-३.३५ टक्के), इन्फोसिस (-२.१९ टक्के), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लि. (-१.५९ टक्के), MphasiS (-१.५० टक्के), एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस (-१.२१ टक्के) हे शेअर्स घसरले.

दरम्यान, टाटा स्टील, पंजाब नॅशनल बँक हे शेअर्स ‍वधारले होते. अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन, अदानी पॉवर हे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरून व्यवहार केला. (Stock Market Opening) अमेरिकेतील शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूह स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉड करत असल्याचा आरोप केला आहे. याचा मोठा फटका अदानी समूहाला बसला आहे. यामुळे अदानी समूहाने २४ जानेवारीपासून १०० अब्ज डॉलर गमावले आहेत.

टॉप गेनर्स आणि टॉप लूजर्स

एनएसई निफ्टीवर टायटन, एल अँड टी, बजाज ऑटो, आयशर मोटर्स, एनटीपीसी हे शेअर्स टॉप गेनर्स होते. टायटनचा शेअर १.८८ टक्क्यांने वाढला. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्टस्, एसबीआय, इन्फोसिस, बजाज फायनान्स हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले.

PSU बँक निर्देशांक घसरला

स्टेट बँक ऑफ इंडिया (-२.८६ टक्के), कॅनरा बँक (-२.६४ टक्के), बँक ऑफ बडोदा (-२.४८ टक्के), पंजाब नॅशनल बँक (-२.२४ टक्के), बँक ऑफ महाराष्ट्र (-२.१३ टक्के), इंडियन ओव्हरसीज बँक (-१.८३ टक्के), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (-१.८० टक्के), युनियन बँक इंडिया (-१.७० टक्के), इंडियन बँक (-१.४७ टक्के), आयडीबीआय बँक (-१.११ टक्के) हे बँकिंग शेअर्स सर्वाधिक घसरले. (Stock Market Closing)

हे ही वाचा :

Back to top button