Share Market Today | आर्थिक मंदीची धास्ती, सेन्सेक्स, निफ्टी स्थिर पातळीवरुन घसरला | पुढारी

Share Market Today | आर्थिक मंदीची धास्ती, सेन्सेक्स, निफ्टी स्थिर पातळीवरुन घसरला

Share Market Today | सकारात्मक जागतिक संकेतांचा मागोवा घेत आणि अमेरिकेच्या महागाई अहवालापूर्वी भारतीय शेअर बाजारातील निर्देशांकांनी गुरुवारी स्थिर पातळीवर सुरुवात केली होती. त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास सेन्सेक्स २०० अंकांहून अधिक घसरून ५९,८७० वर गेला. तर निफ्टी १७,८३० पर्यंत खाली आला होता. दोन्ही निर्देशांकांची आजची वाटचाल स्थिर पातळीवरुन घसरणीपर्यंत गेली आहे. ऑटो आणि आयटी शेअर्स तेजीत आहेत. ऑटो वगळता सर्व क्षेत्रांत घसरण झाली आहे. जागतिक आर्थिक मंदीची गुंतवणूकदारांनी धास्ती घेतली आहे. यामुळे शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढला आहे.

सेन्सेक्सवर टायटनचे शेअर्स आघाडीवर होते. हा शेअर्स सुमारे १ टक्क्याने वधारला आहे. इन्फोसिस, एचसीएल टेकचे शेअर्स तेजीत आहेत. पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, एनटीपीसी, आयटीसी, एसबीआय, मारुती हे सुरुवातीच्या व्यवहारात वाढले होते. तर एशियन पेंट्स, टाटा स्टील, आयसीआयसीआय आणि ॲक्सिस बँक शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

निफ्टी आयटी ०.७१ टक्के आणि निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्स ०.४७ टक्क्याने वाढला आहे. तर निफ्टी मेटल आणि निफ्टी पीएसयू बँकमध्ये घसरण झाली आहे.

अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक बुधवारी मजबूत वाढीसह बंद झाले. कारण महागाईच्या अहवालापूर्वी गुंतवणूकदारांची भूमिका आशावादी राहिली आहे. येथील S&P 500 निर्देशांक ५० अंकांनी म्हणजे १.२८ टक्क्यांनी वाढून ३,९६९ वर बंद झाला. तर Nasdaq Composite १८९ अंकांनी वधारला. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज २६३ अंकांनी वाढून ३३,९६७ वर पोहोचला.

अमेरिकेतील शेअर बाजारातील वाढीचा मागोवा घेत आशियाई शेअर बाजारांनी गुरुवारी तेजीत सुरुवात केली. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक ०.५ टक्के वाढला आणि तो सात महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. (Share Market Today)
दरम्यान, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) काल गुरुवारी ३,२०० कोटी रुपये किमतीच्या भारतीय शेअर्सची विक्री केली, तर जानेवारीत आतापर्यंत एकूण FII नी भारतीय बाजारातून १३,५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक काढून घेतली आहे.

हे ही वाचा :

Back to top button