Stock Market Updates | शेअर बाजारात अस्थिरता! जाणून घ्या यामागील ‘हे’ ५ कारणीभूत घटक?

Stock Market Updates | शेअर बाजारात अस्थिरता! जाणून घ्या यामागील ‘हे’ ५ कारणीभूत घटक?

Stock Market Updates : जागतिक बाजारातून संकेरात्मक संकेत आहेत. पण केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. यामुळे आज बुधवारी (दि.११) शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण दिसून आले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १०० अंकांनी खाली आला होता. त्यानंतर त्याने लगेच स्थिर पातळीवर येऊन तेजीच्या दिशेने वाटचाल केली. सकाळी १०.४० वाजता सेन्सेक्स २०० अंकांनी वाढून ६०,२९४ वर तर निफ्टीने १८ हजारांजवळ व्यवहार केला. त्यानंतर दिवसभर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चढ-उतार दिसून आला. आजच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स किरकोळ १० अंकांनी खाली येऊन ६०,१०५ वर बंद झाला. तर निफ्टी १७,८९५ वर स्थिरावला.

हे होते टॉप गेनर्स, टॉप लूजर्स

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये निफ्टी आयटी निर्देशांक वधारला. निफ्टी मेटलमध्ये वाढ दिसून आली. टाटा मोटर्स, टाटा स्टील, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि टीसीएस हे सेन्सेक्सवरील टॉप गेनर्स होते. तर भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ॲक्सिस बँक हे टॉप लूजर्स होते. टाटा मोटर्सचे शेअर १.२२ टक्क्यांनी वाढले. एयू स्मॉल फायनान्स बँक, बंधन बँक, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक, कोटक महिंद्रा हे बँक निफ्टीवर टॉप लूजर्स होते.

निफ्टी बँक तेजीत

बाजारात कमकुवत स्थिती असतानाही निफ्टी बँक निर्देशांकाने आज सकारात्मक व्यवहार केला. पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक इंडिया आणि आयसीआयसीआय बँक हे निफ्टी बँक निर्देशांकांवर आघाडीवर होते.

आयटी शेअर्संची चांगली कामगिरी, एमफॅसिस, टीसीएस आघाडीवर

मागील सत्रात आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री दिसून आली होती. पण आता आयटी शेअर्संनी तोटा मागे टाकत आघाडी घेतली आहे. आयटीमध्ये एमफॅसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, कोफोर्ज, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, इन्फोसिस हे टॉप गेनर्स होते. हे शेअर्स सुमारे १ टक्क्याने वाढले.

व्याजदरवाढीवर भाष्य नाही, अमेरिकेतील बाजारात उत्साही मूड

अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी त्यांच्या भाषणात व्याजदर धोरणावर भाष्य करणे टाळले. यामुळे अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक ‍वधारले. नॅस्डॅक निर्देशांक १ टक्क्याने वाढला. तर S&P 500 हा निर्देशांक ०.७० अंकांनी आणि डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज ०.५६ टक्क्याने वाढला.

मागणीत घट, कच्च्या तेलाच्या दरात घसरण

दरम्यान, बुधवारी तेलाच्या किमती घसरल्या होत्या. (Stock Market Today) बुधवारी क्रूड ऑइल फ्यूचर्स ०.८४ टक्के घसरून प्रति बॅरल ६,१२५ रुपयांवर आले. तेलाची मागणी कमी झाल्यामुळे दर घसरल्याचे दिसून आले आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर जानेवारी डिलिव्हरीच्या कच्च्या तेलाचा भाव ५२ रुपयांनी म्हणजेच ०.८४ टक्के कमी होऊन ६,१२५ रुपये प्रति बॅरलवर आला.

रुपया मजबूत, डॉलर घसरला

बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ८१.५९ वर गेला आहे. रुपयाचा हा एका महिन्याहून अधिक कालावधीनंतरचा उच्चांक आहे. मागील सत्रात तो ०.७ टक्के वाढला होता. दरम्यान, डॉलर इंडेक्स सात महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

आशियाई बाजारातही पॉझिटिव्ह ट्रेंड

अमेरिकेतील बाजारातील तेजीनंतर जपानमधील शेअर्स बुधवारी उच्च पातळीवर बंद झाले. निक्केई २२५ निर्देशांक १.०३ टक्क्यानी वाढून २६,४४६ वर बंद झाला. तर टॉपिक्स निर्देशांक १.०८ टक्क्यानी वधारुन १,९०१ वर स्थिरावला.

FII कडून विक्रीचा सपाटा कायम

NSE वरील उपलब्ध आकडेवारीनुसार, मंगळवारी (दि.१०) विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) २,१०९ कोटी रुपयांचे शेअर्स विकले तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) १,८०६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news