जगातील दिग्गज कंपन्यांत भारतीयांचा दबदबा! देविका बुलचंदानी बनल्या Ogilvy च्या ग्लोबल सीईओ

जगातील दिग्गज कंपन्यांत भारतीयांचा दबदबा! देविका बुलचंदानी बनल्या Ogilvy च्या ग्लोबल सीईओ

पुढारी डेस्क : जगातील दिग्गज कंपन्यांमध्ये उच्चपदावर स्थान मिळवण्यात भारतीय आघाडीवर आहेत. आता Ogilvy या जाहिरात, मार्केटिंग आणि पब्लिक रिलेशन क्षेत्रात दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एजन्सीत मूळ भारतीय असलेल्या देविका बुलचंदानी (Devika Bulchandani) यांची ग्लोबल सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे. उत्तर अमेरिकेच्या ग्लोबल अध्यक्ष आणि सीईओ म्हणून त्या ओगिल्वीमध्ये रुजू झाल्या होत्या. आता दोन वर्षांहून कमी कालावधीनंतर देविका बुलचंदानी यांची एजन्सीच्या ग्लोबल सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बुलचंदानी यांना "देव" ओळखले जाते. दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी McCann या अमेरिकतील जाहिरात एजन्सीत काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात जागतिक व्यवसायात मास्टरकार्ड जाहिरात संकल्पना राबवून ती यशस्वी करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

अँडी मेन Oglivy च्या CEO होत्या. त्या या पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांची जागा आता बुलचंदानी यांनी घेतली आहे. त्यांच्याकडे Oglivy च्या ९३ देशांमधील १३१ कार्यालयांची जबाबदारी असेल. जाहिरात, पब्लिक रिलेशन, कन्सल्टिंग आणि आरोग्य या क्षेत्रात ही एजन्सी काम करते. Ogilvy एजन्सी WPP चा एक भाग आहे. लंडन मुख्यालय असलेल्या WPP ची उलाढाल १२ अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे.

"देविका अतिशय सर्जनशील आहे." असे WPP चे सीईओ मार्क रीड यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. देविका यांचे बालपण अमृतसरमध्ये गेले आहे. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण डेहराडूनमधील वेल्हॅम गर्ल्स स्कूलमध्ये घेतले आहे. त्यानंतर मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये त्यांनी इंग्रजी आणि मानसशास्त्र विषयातून पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात कम्युनिकेशन्समध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news