स्तनपान व दुग्धदान बाळासाठी अमूल्य

स्तनपान व दुग्धदान बाळासाठी अमूल्य www.pudharinews.
स्तनपान व दुग्धदान बाळासाठी अमूल्य www.pudharinews.
Published on
Updated on

पुढारी वृत्तसेवा : आईच्या दुधामध्ये असणारी अँटीबॉडीज बाळाला वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकणार्‍या संसर्गापासून वाचवितात. बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आईच्या दुधामुळे बाळाच्या पचनसंस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. एवढंच नाही तर याचा लाभ मुलांना भावी आयुष्यातही होतो. रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार, दमा यांसारख्या आजारांपासून बाळाचं संरक्षण होतं. आई आणि बाळाचं नातं अधिक सक्षम करण्यासाठी स्तनपान अतिशय महत्त्वाचं असतं.

जन्म झाल्यावर लगेच स्तनपान सुरू करायला हवं. यामुळे बाळाच्या विकासासाठी मदत होते, त्याचं पोट भरतं, दूध ओढावं लागत असल्यामुळे बाळाच्या क्रियाही गतिशील होतात. मातांमध्ये प्रसूतिपश्चात काही बदलांमुळे जे नैराश्य येतं, त्याचंही प्रमाण स्तनपानामुळे कमी होतं, त्यामुळे आईसाठीही बाळाला दूध पाजणं महत्त्वाचं ठरतं. गरोदरपणात वाढलेलं वजन, प्रसूतीनंतर होणारा अतिरिक्त रक्तस्त्राव, उतारवयातील हाडांचा ठिसूळपणाही स्तनपान केल्याने कमी होतो. स्तनपानामुळे प्रसूतीनंतर लगेचंच गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते. स्तनांच्या कर्करोगाचा धोका टळतो.

स्तनपानाचा आई व बाळास दुहेरी फायदा होतो. एवढेच नव्हे तर आईच्या दुधामुळे आई आणि बाळाच्या मानसिकतेवर दूरगामी सकारात्मक परिणाम होतात. असे असूनही भारतामध्ये स्तनपानाचे प्रमाण अजूनही समाधानकारक नाही. यासाठी रूढी व परंपरागत काही गैरसमज कारणीभूत ठरतात. आईला पहिल्या काही दिवसांत काही विशिष्ट गोष्टीच खायला न देणे, चीक पिळून काढणे, मध चाटवणे, दूध पुरत नाही म्हणून बाळाला गाईचे दूध देणे असे अनेक प्रकार अजूनही आपल्या आजूबाजूला सर्रास घडताना दिसतात.

भारतामध्ये मातांमध्ये स्तनपानाचे प्रमाण वाढविण्यासाठी, त्यांच्यामध्ये स्तनपानाबाबत जागरूता होणे गरजेचे आहे. स्तनपान करताना येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांना सतत आधार देणे आवश्यक आहे. यासाठी उङचउ (उेािीशहशपीर्ळींश ङरलींरींळेप चरपरसशाशपीं उशपीींश) ही संकल्पना प्रत्यक्षात आली. अशा केंद्रांमध्ये सर्व प्रसूती झालेल्या मातांना स्तनपानाबाबत समुपदेशन केले जाते. याच्यासाठी व्हिडीओ तसेच माहितीपुस्तिकेच्या मदतीने ही माहिती दिली जाते.

तसेच मदर सपोर्ट ग्रुप केला जातो; ज्यामध्ये काही उत्साही माता तसेच छॠज च्या मदतीने घरोघरी याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यावर भर दिला जातो. एखाद्या बाळाला त्याच्या आईने पहिले सहा महिने फक्त अंगावरचे दूध (शुलर्श्रीीर्ळींश लीशरीींषशशवळपस) आणि त्यानंतर बाहेरच्या अन्नाबरोबर ते दोन वर्षांपर्यंत पाजणे गरजेचे आहे. अंगावर पाजताना वारंवार येणार्‍या समस्यांबाबत अशा केंद्रांमध्ये तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाते. आईने बाळाला योग्यरीत्या स्तनपान केल्यास,

'माझ्या बाळाला माझे दूध पुरत नाही,' ही तिची तक्रार कधीच राहणार नाही. एवढेच नव्हे तर अशी आई स्तपानाबरोबरच आपले दुग्धदानही करू शकते. (पूर्वार्ध) आईचं दूध हे बाळासाठी अमृत असतं. प्रत्येक बालकास मातेने स्तनपान करणे बाळाच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. बाळासाठी हे दूध पूर्णान्न आहे!

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news